
Happy B'day Arun Govil : जेव्हा देव समजून एका आईने अरूणजींच्या पायावर आजारी बाळाला ठेवले !
टीव्हीवरील महाकाव्य म्हणून 'रामायण'ची आजही ओळख आहे. या टीव्ही मालिकेत प्रभू रामांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना लोकांनी देवाचा दर्जा दिला होता. आज याच अरूणजींचा जन्मदिवस आहे.
अरूण यांना लोक साक्षात देवच मानायचे. हे खुद्द अरुण यांनीच अनेकवेळा सांगितले आहे. टीव्हीवर त्यांची प्रतिमा अशी बनली होती की, लोक त्यांना जिथे पाहायचे तिथे त्यांना देव माणून आशिर्वाद घ्यायचे. असाच एक लोकांच्या श्रद्धेचा किस्सा अरूणजींनी सांगितला होता.

कोविडमध्ये लॉकडाऊन दरम्यान 'रामायण' दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्यात आले. त्यानंतर या मालिकेशी संबंधित अनेक कथा समोर येऊ लागल्या.
हेही वाचा: Ramayan : अरुण गोवील, दीपिका चिखलिया पुन्हा दिसणार राम-सीतेच्या भूमिकेत
अरुणने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा एक महिला आपल्या मुलाला कुशीत घेऊन 'रामायण'च्या सेटवर घेऊन आली.ती सर्वांना विचारू लागली की प्रभू राम कुठे आहेत?. मग सर्वांनी त्या महिलेला अरुण गोविल यांच्याकडे पाठवले. जेव्हा ती महिला अरुणकडे पोहोचली. तेव्हा तिने त्या बाळाला अरूणजींच्या पायावर घातले. ती रडतच म्हणू लागली की, माझे बाळ आजारी आहे, त्याला तूम्हीच आशिर्वाद देऊन बरे करा.
हा प्रकार राहुन अरुणजी घाबरले. त्यांनी त्या महिलेला सांगण्याचा प्रयत्न केला की, मी यात काहीच करू शकत नाही. तूमच्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन जा. तूम्हाला पैशाची मदत करतो पण बाळाला आधी योग्य उपचार करायला रूग्णालयात न्या. त्या दिवशी ती महिला तिथून निघून गेली. पण 3 दिवसांनी ती पुन्हा रामायणच्या सेटवर आली.
हेही वाचा: Bollywood Actors : बॉलिवूड कलाकार जे खऱ्या आयुष्यात करतात शेती
महिलेने अरुणजींना सांगितले की, माझे बाळ बरे झाले आहे. हे ऐकूण त्यांचे समाधान झाले. कारण, ते बाळ बरे व्हावे यासाठी अरूणजींनी देवाकडे प्रार्थना केली होती. त्यामूळे तुम्ही देवाकडे खऱ्या मनाने काही मागितले तर ते नक्कीच मिळते, हा विश्वास अरूणजींच्या मनात निर्माण झाला, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा: प्रेमासाठी काय पण! या अभिनेत्रींनी बदलला लग्नासाठी धर्म Bollywood Actress