Dhanush: एका अफवेने धनुष झाला होता रजनीकांतचा जावई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

कोलावरी डी या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या साउथ स्टार धनुषचा आज 36 वा वाढदिवस आहे. आपल्या कौशल्याच्या बळावर स्टार बनलेल्या या अभिनेत्याला हे यश मिळवायला मात्र बरीच मेहनत घ्यावी लागली. बॉलिवूड सिनेमा रांझनामध्ये कुंदन बनून सर्वांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याची लव्ह स्टोरीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे.

चेन्नई : कोलावरी डी या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या साउथ स्टार धनुषचा आज 36 वा वाढदिवस आहे. आपल्या कौशल्याच्या बळावर स्टार बनलेल्या या अभिनेत्याला हे यश मिळवायला मात्र बरीच मेहनत घ्यावी लागली. बॉलिवूड सिनेमा रांझनामध्ये कुंदन बनून सर्वांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याची लव्ह स्टोरीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे.

धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. पण रजनीकांत याची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचं लग्न मात्र एका अफवेमुळे झालं आणि एक साधारण असा मुलगा सुपरस्टारचा जावई झाला. धनुषचं खरं नाव वेंकटेश प्रभू कस्तूरी राजा आहे. धनुष फक्त अभिनेताच नाही तर प्रोड्यूसर, साँग रायटर आणि प्लेबॅक सिंगर सुद्धा आहे. आदुकलम या सिनेमासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट  अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सध्या धनुष साउथ मधील आघाडीचा अभिनेता मानला जातो मात्र त्याची लव्ह स्टोरी सर्वांपेक्षा वेगळी आहे.

धनुष आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याचं लग्न 2004मध्ये झालं आहे. मात्र त्यांच्या लग्नाची स्टोरी खूपच फिल्मी आहे. त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली आणि मग लग्न कसं झालं याविषयी एक मुलाखतीत स्वतः धनुषनं खुलासा करताना सांगितले होते की, मी माझ्या कुटुंबासोबत 'काढाल कोंडे'  हा माझा सिनेमा पाहायला गेलो होतो. सिनेमा संपल्यानंतर त्या थिएटरच्या मालकानं माझी ओळख रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या यांच्याशी करून दिली. पण त्यावेळी आमचं बोलणं हाय-बाय पर्यंतच झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ऐश्वर्याकडून एक बुके मिळाला. ज्यासोबत एक नोट होती. त्यात लिहिलं होतं. गुड वर्क, संपर्कात राहा. 

यानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांच्यातील बोलणं वाढत गेलं आणि ही गोष्ट मीडिया पर्यंत पोहोचली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. त्यामुळे या सर्व अफवा रोखण्यासाठी दोघांच्याही कुटुंबीयांनी विचार केला आणि मग धनुष-ऐश्वर्याच्या लग्नाची घोषणा करण्यात आली. ऐश्वर्या धनुषपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. धनुषनं जेव्हा ऐश्वर्याशी लग्न केलं त्यावेळी तो फक्त 21 वर्षांचा होता तर  ऐश्वर्या 23 वर्षांची होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday dhanush and aishwarya rajinikanth love story which started with rumours