Happy Birthday : ग्लॅमरस राधिकाने वाढदिवशी शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

बोल्ड, सुंदर आणि बिनधास्त हे कॉम्बिनेशन असलेली अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे, अशी ओळख निर्माण करण्यासाठी तिने खूप संर्घष केला आहे.

मुंबई : बोल्ड, सुंदर आणि बिनधास्त हे कॉम्बिनेशन असलेली अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. अशी ओळख निर्माण करण्यासाठी तिने खूप संर्घष केला आहे. शनिवारी (ता.7) राधिकाचा वाढदिवस. ती 34 वर्षांची झाली असून 'सकाळ' टीमकडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! इंन्स्टाग्रामवर तिने वाढदिवसानिमित्त तिच्या लाडक्या कुत्र्यासोबतचा व्हिडिओ अपलोड केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Birthday morning love!

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिका ती साकारत असते. राधिका तिच्या मतांशी कायमच ठाम असते आणि परखडपणे मांडत असते. कास्टिंग काऊचविषयीसुद्धा ती खुलेपणाने बोलली आहे. 

राधिकाने बॉलिवूडमध्ये 2005 ला पदार्पण केलं. अभिनेता शाहिद कपूरसोबत 'वाह लाइफ हो तो ऐसी' हा पहिला चित्रपट तिने केला. मात्र, 2011 मध्ये आलेल्या 'शोर इन द सिटी' या चित्रपटानमधून तिला खरी ओळख मिळाली.  त्यानंतर तिने अंधाधून, लस्ट स्टोरी, पॅड मॅन, पार्चड, फोबिया, मांझी असे अनेक सुपरहिट सिनेमे केले. याशिवाय ती नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स, घोल या वेब सिरिजमधूनही दिसली. राधिकाने 2011 मध्ये बेनडिक्ट टेलर या संगीतकाराशी लग्न केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday radhika apte