esakal | Video : नीतू यांनी केला लाडक्या 'चिंटूचा बर्थ डे' सेलिब्रेट
sakal

बोलून बातमी शोधा

Video : नीतू यांनी केला लाडक्या 'चिंटूचा बर्थ डे' सेलिब्रेट

Video : नीतू यांनी केला लाडक्या 'चिंटूचा बर्थ डे' सेलिब्रेट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा काल जन्मदिवस होता. त्यानिमित्तानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली. ८० ते ९० च्या दशकांत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे, आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेणारे ऋषी कपूर यांचे बॉलीवूडसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक दिग्गज सेलिहब्रेटींसोबत काम केले. त्यांच्या परिवाराच्या वतीनंही जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी ऋषी कपूर यांचे मोठे कट आऊट तयार करण्यात आले होते. सध्या त्याची आणि त्या सेलिब्रेशनची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चर्चा आहे.

ऋषी कपूर यांची पत्नी नीतु सिंग यांनी या सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो शेयर केले आहेत. यावेळी रुमी जाफरी, शत्रुघ्न सिन्हा, डेव्हिड धवन, रणधीर कपूर, फॅशन डिझायनर मोहिनी छाबडिया यांच्याशिवाय अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यावेळी एका पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते. ऋषी कपूर सोडून गेल्यानंतरही त्यांच्या आठवणीमध्ये भावूक झालेल्या नीतु सिंग या व्हिडिओ मध्ये आहेत. यापूर्वी काही रिअॅलिटी शोमध्ये नीतु सिंग यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. काही मुलाखतींतूनही त्यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला होता. याप्रसंगी ऋषी कपूर यांच्या नावानं एक केकही तयार करण्यात आला होता. त्यावर त्यांचे नाव आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी केकभोवती ठेवण्यात आल्या होत्या.

कॅन्सरशी मोठी लढत दिल्यानंतरही ऋषी कपूर यांच्याकडे फार वेळ नव्हता. काळानं त्यांना आपल्यासोबत नेलं. मात्र त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांचा अभिनय, त्यांची गाणी, त्यांचे संवाद चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सध्या ज्या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यात सेलिब्रेटी ऋषी कपूर यांची गाणी म्हणताना दिसत आहेत. ऋषी कपूर यांच्या फॅन्सनं या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. काल त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रिद्धिमा कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या शेवटच्या शर्माजी नमकीन या चित्रपटाचे पोस्टर्सही शेयर केले आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले.

loading image
go to top