Happy Birthday : बिग बॉस शिवच्या बर्थडेसाठी वीणाचं खास गिफ्ट

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी' चं दुसऱं पर्व नुकतचं संपलं आहे. अमरावतीचा शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरला. आज शिवचा वाढदिवस आहे.

मुंबई : बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी' चं दुसऱं पर्व नुकतचं संपलं आहे. अमरावतीचा शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरला. आज शिवचा वाढदिवस आहे. सकाळ टिमकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शिव याआधी 'रोडिज' या पसिद्ध रिअॅलिटि शोमधून झळकला. रोडिजमध्ये त्याने सेमीफायनलपर्यंत पल्ला गाठला. बिग बॉसच्या घरात तो आपल्या उत्तम खेळीने 100 दिवस टिकून राहिला. अखेर बिग बॉसची ट्रॉफी त्याने आपल्या नावावर केली. 

घरातल्या खेळीमुळे तो अधुन मधुन प्रेक्षकांच्या निशाण्यावर असे. मात्र या शिवाय वीणा आणि त्याच्या नात्यामुळेदेखील तो चर्चेत आहे. फक्त शो साठी हे नातं नसून आम्ही शोमधून बाहेर पडल्यावरही सोबत असू अशी त्या दोघांनी कबुली दिली. दिलेल्या शब्दाप्रमाणे आता ते बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा एकत्र दिसत आहेत. एवढचं नाही तर दोघांची लव्हस्टोरी चाहत्यांनाही आवडतेय. त्यांचे एकत्र फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत असतात. 

शिवच्या वाढदिवसानिमित्त वीणाने काही दिवसांपूर्वीच एक खास गीफ्ट दिलं. तिने चक्क त्याच्या नावाचा टॅटू हातावर काढला. त्यानंतर वीणा शिवच्या आईलादेखील भेटली. शिवने वीणा आणि आईसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Finally.... Rani meet aapli jijau @veenie.j @colorsmarathiofficial @endemolshineind

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday shiv thakare