Har Har Mahadev: 'हर हर महादेव' दाखवू नका.. अखेरचा इशारा! 'झी' विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक

'हर हर महादेव' टीव्हीवर प्रदर्शित करू नका.. स्वराज्य संघटनेचे कडक आदेश..
har har mahadev television premiere banned swarajya sanghatana oppose to zee studios
har har mahadev television premiere banned swarajya sanghatana oppose to zee studios sakal

चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याच्या आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट दाखवू नका यासाठी स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. या चित्रपटाला संभाजीराजे छत्रपती यांनीही विरोध दर्शवला आहे.

(har har mahadev television premiere banned swarajya sanghatana oppose to zee studios )

हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. पण अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे. त्यामुळे आज स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी विनोद साबळे आणि अंकुश कदम यांनी झी स्टुडीओच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनाला थेट इशारा दिलेला आहे.

'हर हर महादेव' हा चित्रपट प्रदर्शित करणार नाही, याची हमी त्यांनी झी स्टुडिओजकडे मागितली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र आणि समस्त शिवभक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष करून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला झी स्टुडीओ जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच वाद सुरू आहे. राष्ट्रवादीने तर अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले होते. बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी चुकीचा इतिहास सांगितला गेला, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करत हा चित्रपट बंद करण्यात आला. त्यांनंतर हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतला, पण त्यालाही आता सडकून विरोध होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com