
Parineeti-Raghav Wedding: परिणीती अन् राघवच ठरलं; गायक हार्डी संधूनेचं केला नात्यावर शिक्कामोर्तब!
सध्या मनोरंजन विश्वात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या जोरदार चर्चा सुरु आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच दोघे लग्न करणार आहेत अशा अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
आपच्याच नेत्यांने ट्विट करत त्याच्या परिणीती अन् राघव या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात प्रियांका चोप्राही राघवला भेटणार आहे असंही बोललं जात आहे.
आता या सगळ्या दरम्यान आता गायक आणि अभिनेता हार्डी संधूने त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं आहे. अभिनेत्री आता तिच्या आयुष्यात सेटल होणार असल्याची पुष्टी त्याने दिली आहे.
गायक आणि अभिनेता हार्डी संधूने सांगितले की, परिणीती चोप्रा शेवटी आयुष्यात स्थिरावत आहे. मुलाखतीदरम्यान अखेर हे सर्व घडत असल्यानं त्याला खूप आनंद होत आहे. त्याना खुप शुभेच्छा देतो, असं हार्डी म्हणाला.
हार्डी संधूने याबरोबर शेअर केले की जेव्हा तो त्याच्या 2022 च्या स्पाय-थ्रिलर 'कोड नेम: तिरंगा' चे शूटिंग करत होता तेव्हा त्याच्यात लग्नाबद्दल चर्चा झाली होती. यावेळी परिणीतीने सांगतिले का जेव्हा तिला योग्य व्यक्ती मिळेल तेव्हाच ती लग्न करेल. हार्डीने हेही सांगितलं की तो परिणीतीसोबत फोनवर बोलला आणि फोन करून त्याला अभिनंदन केले.

लग्नाच्या अफवांदरम्यान सुरु असतांनाच पुन्हा परिणीती आणि राघव हे दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी त्यांनी पापाराझी आणि पत्रकारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या बातम्या जोर धरु लागल्या आहेत.