esakal | मुंबईतला 'तो' भूत बंगला, ज्यात राहणारे अभिनेते झाले 'सुपरस्टार' 
sakal

बोलून बातमी शोधा

haunted house in mumbai actor rajesh khanna rajendra kumar got popular after buying it

प्रत्येक कलाकाराला बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावयचे असते. त्याचं ते स्वप्न असतं. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची ताकद असते.

मुंबईतला 'तो' भूत बंगला, ज्यात राहणारे अभिनेते झाले 'सुपरस्टार' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडची नगरी म्हणून मुंबईचे नाव जगात आहे. आजही भारताच्या कानाकोप-यातून अनेकजण हिरो व्हायच्या आशेनं या मायानगरीत पाऊल ठेवतात. त्या नगरीची जादुही तशीच आहे. ती जशी दिसते तशी नाही. जीवघेणे कष्ट, संघर्ष करुन त्याच्या वाट्याला यश मिळण्याची कोणतीही शाश्वती या शहरात नाही. कुणाला काहीही न करताही यशाच्या शिखरापर्यत घेऊन जाण्याची ताकद मुंबापुरीत आहे. वेगवेगळ्या रहस्यांनी हे शहर नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे. 80 आणि नव्वदीच्या दशकात बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या शहरात मोठमोठे बंगले बांधले. त्यांनी मुंबईतील ज्या भागात बंगले बांधले त्या भागाला वेगळ वलय प्राप्त झाल्याचंही दिसून आलं आहे. आता आपण अशाच एका बंगल्याची चर्चा करणार आहोत ज्या बंगल्याला भुत बंगला असं म्हटलं गेल. प्रत्यक्षात त्या बंगल्यात राहणाारा प्रत्येक कलाकार सुपरस्टार झाला होता.

प्रत्येक कलाकाराला बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावयचे असते. त्याचं ते स्वप्न असतं. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची ताकद असते. मुंबईतील एका बंगल्याची गोष्ट भलतीच लोकप्रिय आहे. त्या बंगल्यात राहणा-या दोन जणांना पुढं सुपरस्टार म्हणून ओळखण्यात आलं होतं. आपण चर्चा करत आहोत ती मुंबईतील क्वार्टर गेट येथे असणा-या एका सुंदर बंगल्याची. त्यात प्रसिध्द कलाकार राजेश खन्ना आणि राजेंद्र कुमार राहत होते. त्यांचं तर नशीबच पालटून गेलं होतं. या दोन्ही कलाकारांना त्या बंगल्याविषयी खूपच प्रेम होतं. त्यावेळी त्या बंगल्याला भूत बंगला असं म्हटलं जात होतं. मात्र तो बंगला या दोन्ही कलावंतांसाठी लक्की ठरला होता.

फार जूनी गोष्ट आहे ही. ज्यावेळी क्वार्टर गेटजवळ असणा-या त्या बंगल्याला लोकं भुतबंगला म्हणून ओळखत असे. त्यामुळे त्या बंगल्याचा मालक त्या घराला हव्या त्या किंमतीत द्यायला तयार होता. त्यावेळी अभिनेता राजेंद्र एका मोठ्या घराच्या शोधात होते. त्यांना या घराविषयी माहिती कळली. आणि त्यांनी त्यावेळी 60 रुपयांमध्ये हा बंगला खरेदी केला होता. राजेंद्र यांनी या बंगल्याला डिंपल असे नाव दिले होते. त्या बंगल्यामुळे राजेंद्र यांचं नशीब बदललं असं म्हटलं जातं. जो अभिनेता काही वर्षांपूर्वी संघर्ष करत होता त्याला आता मोठं यश मिळालं होतं.

ज्यावेळी बॉलीवूडमध्ये राजेश खन्ना यांची एंट्री झाली तेव्हा त्यांनी राजेंद्र कुमार यांच्या घरासमोर घर खरेदी करण्याची विनंती केली. राजेश खन्ना यांना राजेंद्र यांचा बंगला खरेदी करण्याची इच्छा होती. त्याला राजेंद यांनी होकार दिला. मात्र राजेंद्र यांनी राजेश यांच्या समोर एक अट ठेवली ती म्हणजे त्या बंगल्याचे नाव बदलायचे. त्याला राजेश यांनी होकार दिला. त्यांनी 3 लाख रुपयांमध्ये हा बंगला खरेदी केला आणि त्याचे नाव आशीर्वाद असे ठेवले. भलेही काही लोकांनी या बंगल्याला भूत बंगला असे म्हटले असेल मात्र त्यामुळे काही कलाकारांचं नशीब उजळले हे खरे आहे. 
 


 
 

loading image