नाद खुळा! 'पुष्पा'मधल्या 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठमोळं व्हर्जन

हे नाही ऐकलं तर काय ऐकलं..
Srivalli
Srivalli

'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचं अभिनय, हटके गाणी आणि समंथा रुथ प्रभूचं आयटम साँग अशा सर्वच गोष्टी चर्चेत आल्या आहेत. 'सामी सामी' आणि 'ऊ अंटावा' या गाण्यांनी धुमाकूळ घातला. आता 'श्रीवल्ली' या गाण्याची एक वेगळीच क्रेझ सोशल मीडियावर पहायला मिळतेय. 'पुष्पा' हा चित्रपट तेलुगूसोबत हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेतरी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या इतर भाषांमध्येही गाणी डब करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे 'श्रीवल्ली' या गाण्याचं मराठी व्हर्जन सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Srivalli song )

एका अवलियाने 'श्रीवल्ली'चं मराठी व्हर्जन चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे आणि त्याच्या या भन्नाट कौशल्याला रसिकांनीही दाद दिली आहे. विजय खंदारे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं पोस्ट केलं आहे. या मराठी गाण्यात लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोबाइल कॅमेरावर शूट केलेला हा व्हिडीओ आहे. विजय खंदारे आणि तृप्ती खंदारे यांनी त्यात अभिनय केलंय. अमरावतीमधील 'श्रीनिवास' स्टुडिओमध्ये 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठी व्हर्जन रेकॉर्ड करण्यात आलंय. अवघ्या १२ दिवसांत या गाण्याला ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५० हजार लाइक्स मिळाले आहेत.

Srivalli
Vamika Turns One: पहा विराट-अनुष्काने आजपर्यंत शेअर केलेले वामिकाचे फोटो

हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या करिअरमधील पहिला आयटम साँग या चित्रपटात आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन 'रफ अँड टफ' लूकमध्ये पहायला मिळतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com