Hema Malini Birthday: बॉलीवुडची ड्रीम गर्ल गाजवतेय राजकीय मैदान! वाचा सविस्तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hema Malini Birthday dream girl to MP her journey political career movies

Hema Malini Birthday: बॉलीवुडची ड्रीम गर्ल गाजवतेय राजकीय मैदान! वाचा सविस्तर..

Happy Birthday Hema Malini: बॉलीवूडची 'ड्रीम गर्ल' असणा-या हेमा मालिनी यांचा आज जन्मदिवस. आज त्या आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. हेमा यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने कायमच प्रेक्षकांना घायाळ केले आहे. वयाच्या 74 व्या वर्षीही त्या अत्यंत देखण्या आणि सतेज दिसतात. त्यांच्या व्यक्तीमत्वातली हीच चमक त्यांनी राजकारणात देखील दाखवली. आज केवळ अभिनेत्री नाही तर खासदार हेमा मालिनी अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे अभिनयासोबतच राजकीय मैदान गाजवणाऱ्या या ड्रीम गर्ल प्रवास तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया..

(Hema Malini Birthday dream girl to MP her journey political career movies)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: आज कुणाची खैर नाही, मांजरेकर करणार सदस्यांची ऐशीतैशी..

अभिनेत्री हेमा मालिनीचा (hema malini)अभिनय क्षेत्रातील अनुभव प्रचंड दांडगा आहे. त्यांनी बालवयातच मनोरंजन विश्वात पदार्पण केले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1961मध्ये आलेल्या तेलुगु चित्रपट 'तपंडव वनवासन'मध्ये हेमा मालिनी यांनी एका नर्तिकेची भूमिका साकारली होती. तिथून सुरू झालेला प्रवास ड्रीम गर्ल पर्यंत येणं सोप्पं नव्हतं. पुढे त्यांनी हिंदीमध्ये नशीब आजमावलं. त्यासाठी त्यांनी हिंदी भाषा शिकून घेतली. 1968 मध्ये रिलीज झालेला 'सपनो का सौदागर' हा हेमा मालिनी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांचा प्रवास कधीही थांबला नाही. मग ड्रीम गर्ल असो किंवा शोले मधली बसंती त्या एकास एक भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर करत गेल्या.

पुढे हेमा केवळ मनोरंजन विश्वापुरत्याच मर्यादित राहिल्या नाही तर त्यांनी योग्य वेळी राजकारणाची वाट निवडली. दरम्यानच्या काळात त्या चित्रपटांपासून लांब गेल्याने त्या बसून राहिल्या नाहीत तर आपल्यातील धमक ओळखून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काही वर्ष पक्षासाठी काम करत 2014 मध्ये त्या मथुरा येथून लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आल्या. असं म्हणतात की, हेमा मालिनी यांना कधीच राजकारणात यायचे नव्हते पण विनोद खन्ना यांनी हेमा मालिनी यांना राजकारणाचा मार्ग दाखवला. पण ज्या दिवशी त्या राजकरणात आल्या त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजही संसदेत त्या अत्यंत धडाडीने लोकांचे प्रश्न मांडत असतात. विविध मुद्यांवर चर्चा करत असतात. त्यामुळे संसदेतही त्यांच्या नावाला आज मोठे वलय प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Hema Malini