hemangi kavi dance in theatre while watching jawan shah rukh khan
hemangi kavi dance in theatre while watching jawan shah rukh khanSAKAL

Hemangi Kavi: जवान बघताना थिएटरमध्ये नाचली हेमांगी कवी, शाहरुखवर एकदम फिदा, व्हिडीओ व्हायरल

हेमांगी कवीचा जवान बघताना व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय
Published on

Hemangi Kavi on Jawan: सध्या जवान बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. जवान पाहायला सर्व वयोगटातील प्रेक्षक गर्दी करत आहेत. जवान पाहायला सर्व प्रेक्षक थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत.

अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी जवान पाहायला गेली. हेमांगी कवी शाहरुख खानची मोठी फॅन आहे. जवान पाहायला जाताना हेमांगी स्वतःला रोखू शकली नाही. आणि ती थिएटरमध्ये नाचली. बघा काय घडलं.

(hemangi kavi dance in theatre while watching jawan)

hemangi kavi dance in theatre while watching jawan shah rukh khan
Bigg Boss 17: सलमान खानचं वेगळं रुप, बिग बॉस 17 चा नवीन प्रोमो भेटीला, या महिन्यात होणार खेळ सुरु?

जवान बघायला गेलेली हेमांगी कवी थिएटरमध्ये नाचली

हेमांगी कवी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. हेमांगी कवीने काल सोशल मिडीयावर इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केलाय.

या व्हिडीओत हेमांगीने जवानमधल्या चलेया गाण्यावर थिएटरमध्ये डान्स केला. मी स्वतःला रोखू शकले नाही. असं कॅप्शन देत हेमांगीने तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केलाय.

शाहरुखचा जवान पाहायला हेमांगी अगदी नटून थटून गेली होता. एकुणच जवान पाहून हेमांगी शाहरुखवर आणखीन फिदा झाल्याचं दिसतंय.क

जवान मधल्या गिरीजाचं हेमांगीने केलं कौतुक

जवान मध्ये मराठमोळ्या गिरीजाने शाहरुखसोबत काम केलं. गिरीजाच्या भुमिकेचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. गिरीजाने शाहरुखसोबत जवानमध्ये जबरदस्त भुमिका साकारलीय. गिरीजा जवानमध्ये शाहरुखसोबत धमाकेदार डान्स केलंय.

हेमांगी कवीने सुद्धा जवान पाहून गिरीजाचं कौतुक केलंय. हेमांगीने गिरीजाचा सिनेमातला एक फोटो शेअर करुन लिहीलंय, "Wohooo" असं कॅप्शन देत गिरीजाचं कौतुक केलंय.

शाहरुखचा जवान गदर 2 चा रेकॉर्ड मोडणार?

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. त्यामुळे आता शाहरुखचा जवान त्याच्या पठाणचा आणि सनी देओलच्या गदरचा रेकॉर्ड मोडू शकतो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जवान ७ सप्टेंबरला सगळीकजे रिलीज होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com