Hemant Dhome Troll: चुकीच्या ट्विट प्रकरणी हेमंत ढोमेला धमकी.. शाहरुखचे गोडवे गाणं पडलं महागात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant dhome deletes tweet about shahrukh khan pathaan after threat by a tweeter user

Hemant Dhome Troll: चुकीच्या ट्विट प्रकरणी हेमंत ढोमेला धमकी.. शाहरुखचे गोडवे गाणं पडलं महागात..

Hemant Dhome Troll: समाज माध्यमांवर आपले विचार प्रकट करत, अनुभवांची देवघेव करत चाहत्यांशी संवाद साधणाऱ्या अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेला हाच अनुभव सोशल करणं महागात पडलं आहे. कारण चुकीचे ट्विट करून खोटी माहिती पसरवल्याने त्याला धमकीला सामोरे जावे लागले आहे.

(Hemant dhome deletes tweet about shahrukh khan pathaan after threat by a tweeter user)

सोशल मीडियावर प्रचंय सक्रिय असणाऱ्या हेमंतने नुकतेच एक ट्विट शेयर केले होते. यामध्ये त्याने 'स्टारडम काय असतं..' हे सांगत अभिनेता शाहरुख खानचा अनुभव सांगत भरभरून कौतुक केलं होतं. 'पठाण'ला मिळालेलं यश पाहून त्याने ही ट्विट केलं होतं. पण हेच ट्विट त्याला महागात पडलं आहे.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

या ट्विट मध्ये हेमंत म्हणाला होता, "मी इंग्लंडमधे असताना शिक्षण संपल्या नंतर काही काळ नोकरी करत होतो… एक दिवस कामावर निघालो ट्युब स्टेशन वर आलो आणि कळलं आजचा प्रवास मोफत असणार आहे… चौकशी केल्यानंतर लक्षात आलं आज शाहरूख खान चा कार्यक्रम आहे लेस्टर स्केअर ला… म्हणुन तिथल्या सरकारने सर्वांसाठी प्रवास मोफत केलाय…"

"मग लक्षात आलं ते स्टारडम म्हणजे काय असतं… आपल्या देशाबाहेर आपल्यासाठी तिथलं सरकार प्रवास मोफत करतं तुमचं काम सेलिब्रेट करतं! कमाल! आज पठाणच्या निमित्ताने १८ वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला… आजही त्या माणसाची जादू कायम आहे… हे खूप प्रेरणागायी आहे…" असे ट्विट हेमंतने केले होते.

पण याच ट्विट ने त्याला आता अडचणीत आणले आहे. ही ट्विट धादांत खोटे असून वास्तवात असे काहीच घडले नाही असा दावा इंग्लंडच्या नाना सरांजमे यांनी केला आहे.

एक ट्विट करत त्यांनी लिहिलं आहे की, 'ही सगळं खोटं आहे. गेली 20 वर्षे मी इथे इंग्लंड मध्ये राहतोय. पण आजवर कधीही तिथल्या परिवहन संस्थेने अशी सवलत दिलेली नाही. किंबहुना शाहरुख किंवा कोणत्याच अभिनेत्यासाठी असा मोफत प्रवास इथे लागू केला नाही.'

पुढे त्यांनी लिहिलं आहे, 'हेमंत ढोमे, चुकीची माहिती पसरवणारे ही ट्विट जर तुम्ही डिलिट केले नाही किंवा मागे घेतले नाही तर खोट्या बातम्या परसावल्या प्रकरणी मी इंग्लंड मधील संबंधित अधिकाऱ्याकडे मी तुमच्या विरोधात तक्रार करेन. ' असे अत्यंत परखडपणे त्यांनी सांगितले आहे. या ट्विटनंतर हेमंतने हे ट्विट डिलिट केलं आहे.