Aatmapaphlet: "कोणालाही काय घरी घेऊन येतोस?”, मित्राच्या आईचं ते वाक्य हेमंत कधीच विसरू शकला नाही

हेमंत ढोमेने आत्मपॅफ्लेट सिनेमा पाहून त्याच्या बालपणीची कटू आठवण सांगितली आहे
hemant dhome share his childhood incident after watch aatmapamphlet marathi movie
hemant dhome share his childhood incident after watch aatmapamphlet marathi movieSAKAL

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेलेला आत्मपॅफ्लेट सिनेमा काल ६ ऑक्टोबरला सगळीकडे रिलीज झालाय. सिनेमाचं सगळीकडे कौतुक होतंय.

अशातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता - दिग्दर्शक हेमंत ढोमेने आत्मपॅफ्लेट सिनेमा पाहून त्याच्या बालपणीची कटू आठवण सांगितली आहे.

(hemant dhome share his childhood incident after watch aatmapamphlet)

hemant dhome share his childhood incident after watch aatmapamphlet marathi movie
Aatmapamphlet Trailer: "लव्ह अ‍ॅट फर्स्ट हॅण्ड" आशिष बेंडे अन् सृष्टी दामलेच्या लव्ह स्टोरीचा त्रिकोण!

हेमंत ढोमेने आत्मपॅफ्लेट सिनेमा पाहून पोस्ट लिहीलीय की, "माझ्या भावांनो, आत्ता ज्या सिनेमाची आजच्या काळात आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे असा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आलाय…

माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेलं सारंकाही या सिनेमात आहे…
सातवीत एका मित्राच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याच्या आईने मला ऐकू येईल असं मोठ्ठ्याने बोलत एक वाक्य उद्गारलं होतं… “हा कोण आहे माहित आहे का तुला? कोणालाही काय घरी घेऊन येतोस?”

हेमंत पुढे लिहीतो, "हा सिनेमा पाहताना ते सारं डोळ्यासमोरून गेलं… आणि आज त्या मित्राच्या आईचा चेहेरा आठवला… तो चेहेरा खूप बिचारा वाटत होता आज!

हे घडलं तेव्हा मला जे काही वाटलं होतं त्या माझ्या मनस्थितीचं, माझं “आत्मपॅम्प्फलेट” आज आशिषने अतिशय पोटतिडीकीने मांडलं आहे…"

hemant dhome share his childhood incident after watch aatmapamphlet marathi movie
Jawan Malegaon: शाहरुखच्या फॅन्सचा धिंगाणा! मालेगावमध्ये थिएटरमध्ये फोडले रॉकेट आणि फटाके, व्हिडीओ व्हायरल

हेमंत शेवटी सिनेमाबद्दल लिहीतो, "मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न “लाजवाब”
या अत्यंत महत्त्वाच्या सिनेमाचं दिग्दर्शन करणारा बेंडे, तो लिहीणारा मोकाशी, तो अतिशय कमालीने चित्रीत करणारा जाधव, तो शिताफिने एडीट करणारा फैसल, त्याचं अप्रतिम पोस्टर बनवणारा गुरव, निर्मिती करणारे अय्यर, राय, कुमार, कुलकर्णी… भावांनो!!! तुम्हाला या ढोमे-पाटलाची घट्ट मिठी!!! नम्र विनंती - हक्काने सांगतोय हा आपला सिनेमा आहे, लवकरात लवकर जाऊन चित्रपटगृहात जाऊन बघा!"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com