प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच ट्विट चर्चेत..

National Cinema Day: हेमंतच्या या ट्विटनं सर्वांनाच विचारात टाकलं आहे.
hemant dhome tweet on movies ticket rate and audience economic capacity on national cinema day
hemant dhome tweet on movies ticket rate and audience economic capacity on national cinema daysakal
Updated on

hemant dhome : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा झिम्मा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. आज राष्ट्रीय चित्रपट दिन आहे (national cinema day) या निमित्ताने देशभरात आज 75 रुपयात चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावरच आज हेमंतने एक ट्विट केले आहे. अत्यंत सूचक अशा या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. (marathi actor hemant dhome tweet on ticket rate of films and audience national cinema day)

यंदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन २३ सप्टेंबर राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे. याच औचित्य साधून प्रेक्षकांनी कमीत कमी खर्चात चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी ७५ रुपये तिकिटाची घोषणा करण्यात आली. यादिवशी कोणताही चित्रपट तुम्ही ७५ रुपयांमध्ये बघू शकतात. या संकल्पनेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षरशः सगळे शो हाऊसफुल्ल जात आहेत. याच परिस्थितीवर अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ट्विट केले आहे.

''आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का’?'' असे ट्विट त्याने केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने एका गंभीर प्रश्नाला हात घातला आहे.

हेमंतच्या या मताला अनेकांनी सहमती दर्शवली आहे. याशिवाय चित्रपटगृहात मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थाविषयी देखील नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेमंत हा उत्तम दिग्दर्शक आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ सारख्या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. नुकताच त्याचा ‘झिम्मा’ हा चित्रपट येऊन गेला होता. ‘चोरीचा मामला’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘क्षणभर विश्रांतीसारख्या’ मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. लवकरच त्याचा 'सनी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com