'एक जमाना था जब हम भी..'; लहान भावाच्या जन्मानंतर तैमुरवरून भन्नाट मीम्स व्हायरल

सकाळ ऑनलाइन
Monday, 22 February 2021

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

अभिनेता सैफ अली खान व त्याची पत्नी करीना कपूर खान यांच्या घरी रविवारी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. करीना दुसऱ्यांदा आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला. एकीकडे सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मीम्सचाही पाऊस पडू लागला. करीना व सैफचा पहिला मुलगा तैमुर अली खान याच्या स्टारडम सर्वश्रुत आहे. तैमुरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. अशातच त्याच्या लहान भावाच्या जन्मानंतर त्याच्या प्रसिद्धीवर काय परिणाम होईल, यावरून भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले. 

चित्रपटांचे डायलॉग्स, तैमुरचे फोटो आणि भन्नाट कल्पकता वापरून हे मजेशीर मीम्स नेटकऱ्यांनी तयार केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. लहान भावाच्या जन्मानंतर आता संपत्तीचाही वाटा दोघांमध्ये होणार, यावरूनही गमतीशीर मीम्स पाहायला मिळत आहेत. 

करीनाने रविवारी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूर सहानी हिने सर्वांत आधी इन्स्टा स्टोरीवर ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. त्यानंतर काही वेळाने सैफ अली खानने करीनाला मुलगा झाल्याचं अधिकृतरित्या चाहत्यांना कळवलं. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव तर होत आहे, त्याचसोबतच त्यांच्या घरी सेलिब्रिटींकडून विविध भेटवस्तू येण्यास सुरुवात झाली आहे. बाळाच्या जन्माआधी सैफ व करीना तैमुरसह नवीन घरात राहायला गेले. 

एकीकडे तैमुरवरून मीम्स व्हायरल होत असताना दुसरीकडे बाळाच्या नावावरूनही चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. पहिल्या बाळाचं नाव तैमुर ठेवलं, मग आता दुसऱ्या बाळाचं नाव औरंगजेब किंवा बाबर ठेवणार का, अशी खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hilarious memes viral on taimur as kareena kapoor gives birth to baby boy