Video:'धिप्पाड बायको,खुजा हिमेश'; एअरपोर्टवर रंगली फोटोसाठी कसरत Himesh Reshammiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singer Himesh Reshammiya  with wife Sonia Kapoor

Video:'धिप्पाड बायको,खुजा हिमेश'; एअरपोर्टवर रंगली फोटोसाठी कसरत

नाकात गाणारा गायक म्हणून हिमेश रेशमियाची(Himesh Reshammiya) खिल्ली सर्वसामान्यांपासून थेट सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच उडवली. पण तरीही हिमेश मात्र त्याच्या गाण्यांमुळे हिट झाला अन् त्याचं नाव बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक-संगीतकारांमध्ये घेतलं जाऊ लागलं. सलमाननं हिमेशला त्याच्या 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमातील दोन गाण्यांसाठी संगीतकार म्हणून ब्रेक दिला होता. तिथनं पुढे मग हिमेशनं 'तेरा सुरुर','आशिक बनाया' सारख्या अनेक हिट गाण्यांनी आपलं नाणं इंडस्ट्रीत खणखणीत वाजवून दाखवलं. अलिकडे तो काही म्युझिकल शोज चा परिक्षक म्हणून काम करताना देखील दिसला आहे. हिमेशने आपलं २२ वर्षांचं लग्नाचं नातं संपवत अभिनेत्री सोनिया कपूर(Sonia Kapoor)सोबत दुसरं लग्न केलं. पण तिच्याशी लग्न केल्यानंतर हिमेशचा कायापालटच झाला. तो अचानक स्लीम-ट्रीम दिसू लागला.स्टायलिश हेअर कट आणि डिझायनर कपड्यांचा त्याचा ट्रेन्डी लूक नजरेतनं सुटला नाही कोणाच्याच. हिमेशने अभिनेता म्हणून आपली हौस भागवताना देखील स्वतःची इतकी काळजी घेतली नव्हती जितकी तो आपली दुसरी बायको सोनियाला सूट व्हावं म्हणून घेत आहे.

नुकताच हिमेशचा आपली पत्नीसोबतचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून सोशल मीडियावर मात्र त्याचं हसं झालं आहे. त्याचं झालं असं की हिमेश आपली पत्नी सोनिया कपूरसोबत एअरपोर्टवर दिसला अन् त्याच्यामागे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर लागले. तेव्हा पत्नीसोबत फोटो काढताना उभ्या राहिलेल्या हिमेशच्या कसरती कॅमेऱ्यानं अचूक टिपल्या. सोनिया तशी धिप्पाड आहे. हिमेशच्या समोर धिप्पाडच म्हणावं लागेल. कारण हिमेशपेक्षा ती उंच आहे,तगडीसुद्धा आहे. त्यामुळे तिच्यासमोर खुजं वाटू नये म्हणून हिमेश फोटो काढताना आपल्या टाचा उंचावून उभा राहिला. अनेकदा फोटो काढताना तसं उभं राहणं त्याला अवघड जात होतं,पण स्टाईल मारणार नाही तो हिमेश कसला. त्यानं फोटो परफेक्ट यावा म्हणून टाचा उंचावण्याची कसरत सुरू ठेवली. अन् मग काय त्या व्हायरल व्हिडीओवरनं ट्रोलर्सना आयतच खाद्य मिळालं.

हेही वाचा: सई ताम्हणकर झालीय हैराण; इलाज नाही म्हणतेय

या व्हिडीओला पाहून हिमेश-सोनियाच्या जोडीला नेटकऱ्यांनी काही हॉलीवूड कपल्सची नावं दिलीयत. ज्यात टॉम हॉलंड-झेन्दाया,टॉम क्रुझ-निकोल किडमॅन यांची नावं सामिल आहेत. पण नेटकरी म्हणालेयत,''या हॉलीवूड कपल्समध्ये देखील उंच-बुटका अशी अडचण आहे,पण कधी या हिमेशसारखी कसरत त्यांना करताना आम्ही पाहिलं नाही''. कुणी म्हटलंय,''टॉम क्रुझसारखं हिमेशला कुठे जमणार आहे स्वतःला इतकं परफेक्ट कॅरी करायला''.तर कुणी म्हटलंय,''कशाला नसते उद्योग,जे आहे ते आहे''. अशा अनेक प्रतिक्रियांनी ट्वीटरवर चर्चा रंगली आहे हिमेशच्या त्या कसरतीची. पण यावरनं थोडं शहाणपण घेऊन पुढच्या वेळेला हिमेश फोटो काढताना बायकोसोबत शांत उभा राहिलेला दिसेल,कोणतीही कसरत न करता ही अपेक्षा बाळगूया.

Web Title: Himesh Reshammiya Was Seen Standing On His Toes To Match His Wifes Height In A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..