esakal | मला लग्नचं नाही करायचं, कुणाला काही प्रॉब्लेम ?; सलमानचा बिग बॉसमधल्या स्पर्धकांना प्रश्न 
sakal

बोलून बातमी शोधा

Hina Khan Bigg Boss 14 seson participant asked question to Salman Khan about Marriage Weekend  Episode

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या भाईजानच्या लग्नाच्या चिंता त्याच्या चाहत्य़ांना सतावत आहे.सलमान लग्न कधी करणार हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय झाला आहे.  अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावंही जोडलं जातं.

मला लग्नचं नाही करायचं, कुणाला काही प्रॉब्लेम ?; सलमानचा बिग बॉसमधल्या स्पर्धकांना प्रश्न 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये एका अभिनेत्याला त्याच्या लग्नावरुन सतत प्रश्न विचारला जातो. त्यावरुन ब-याचदा चर्चाही झडत असते. प्रत्यक्षात ज्याच्या लग्नाच्या प्रश्नावरुन ही उलट सुलट चर्चा होते त्या अभिनेत्याला या प्रश्नाने गेल्या अनेक वर्षांपासून हैराण केले आहे. इतर कुणाच्या लग्नाचा प्रश्न आला की, त्यावरुन मला प्रश्न विचारण्यात येतो. लोकं असं का करतात असा सवाल त्या अभिनेत्याने विचारला आहे.

बिग बॉसच्या सेटवर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला लवकरच लग्न करणार आहे अशी  माहिती त्या शो चा होस्ट सलमान खानने दिली. त्यानंतर त्या शो मधल्या स्पर्धकांनी सलमानलाच त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यात अभिनेत्री हिना खानने सलमान खान लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यावर भाईजान म्हणाला, “माझं लग्न झालं आहे. खरं तर माझं लग्न करण्याचं वय झालं आहे. पण आता लग्न करण्याचं वय उलटून गेलं आहे. अरे, मला नाही करायचं लग्न. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का कोणाच्याही लग्नाचा मुद्दा निघाला की थेट माझ्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात”, असं सलमान म्हणाला.

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या भाईजानच्या लग्नाच्या चिंता त्याच्या चाहत्य़ांना सतावत आहे.  सलमान  लग्न कधी करणार हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय झाला आहे.  अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावंही जोडलं जातं. त्यामुळे सलमान कायम या प्रश्नांची उत्तर देण्याचं टाळत असल्याचं दिसून येतं. मात्र, बिग बॉस१४ च्या सेटवर त्याने लग्नाविषयी खुलासा केला आहे. विशेष म्हणजे माझं लग्न झालं आहे असं तो म्हणाला आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.

दरवेळी सलमान त्याचे अफेअर आणि त्याच्या लग्नाच्या वर्षाबाबत चर्चा होतच असते. अर्थात सलमानला यात फार काही नाविन्य वाटत नसले तरी त्याच्या फॅन्सला यासगळ्यात कमालीचा रस आहे. बिग बॉस १४ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पाहायला मिळाला. तेव्हा शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे भविष्य सांगण्यासाठी एक ज्योतिष व्हिडीओ कॉलद्वारे तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान त्यांनी सलमानच्या लग्नाविषयी देखील भविष्यवाणी केली होती.

एजाज आणि निकीचे भविष्य ऐकल्यानंतर सलमानने हसत हसत जनार्दन यांना तुम्ही सहा वर्षांपूर्वी माझे लग्न होणार आहे असे सांगितले होते पण झालेच नाही. ते ऐकून प्रेक्षकांना हसू अनावर झाले. तसेच सलमानने पुढे असा काही उपाय आहे का ज्याने माझे लग्नच होणार नाही असे म्हटले. सलमानचे प्रश्न ऐकल्यावर जनार्दन यांनी, तुझे लग्न होणार होते पण काही कारणास्तव ते नाही झाले असे म्हटले. आता तुझ्या लग्नाचा योग नसल्याचे देखील म्हटले होते.