esakal | वडिलांचा मोठा आधार होता, हिनाची भावनिक पोस्ट

बोलून बातमी शोधा

Hina khan first  social media  post  after  her  father demise

वडिलांचा होता मोठा आधार, हिनाची भावनिक पोस्ट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री हिना खानला 20 एप्रिल रोजी पितृशोक झाला. वडिलांच्या निधनाचा हिनाला धक्का बसला होता. त्यामुळे ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. नुकतीच हिनाने वडिलांच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांसमोर दु;ख व्यक्त केले आहे. हिनाच्या वडिलांचे निधन कार्डियक अरेस्ट या आजाराने झाले. हिनाच्या वडिलांचे जेव्हा निधन झाले तेव्हा ती अभिनेता शाहिर शेखसोबत कश्मिरमध्ये शूटिंग करत होती. जेव्हा तिला वडिलांची ही दुख;त घटना कळाली तेव्हा ती लगेचच तिच्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये पोहोचली. सोशल मीडियावर तिने शेअर केली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

हिनाने सोशल मीडियामधील पोस्टमध्ये लिहीले,’ माझे प्रिय वडिल असलम खान 20 एप्रिल 2021 रोजी आम्हा सगळ्यांना सोडून गेले.या कठिण काळात तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांबाबत आणि कुटुंबा बाबत जी चिंता व्यक्त केली. त्यासाठी मी तुमची आभारी आहे. मी आणि माझे कुटुंब दु;खी आहे. माझ्या वर्क कमिटमेंटमुळे माझे सोशल मीडिया अकाऊंट माझी टीम सांभाळत आहे. तुम्ही जो आधार आणि प्रेम दिले त्यासाठी मी तुमचे आभार मानते.’ पोस्टमधून हिनाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मोठ्या संघर्षानं टिव्ही क्षेत्रात हिनानं आपलं नाव आणि ओळख तयार केली. दरम्यान तिला तिच्या वडिलांचा मोठा आधार होता. त्यांच्या निधनानं तिच्यावर मोठा आघात झाला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हिनानं काही वेबसीरिजमध्येही काम केले होते. तसेच 'हैक’ या प्रसिध्द चित्रपटात हिनाने काम केले आहे.

img

hina khan post