दिपक दोब्रियाल पहिल्यांदाच मराठीत; 'बाबा'मध्ये प्रमुख भूमिका

Hindi actor Dipak Dobriyal first time in Marathi film
Hindi actor Dipak Dobriyal first time in Marathi film

दिपक दोब्रीयाल यांनी ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ हा त्यांच्यासाठी अत्यंत वेगळा आणि समाधान देणारा चित्रपट ठरला. ते म्हणतात की, त्यांची बारा वर्षांची चित्रपट कारकीर्द एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला! त्यांच्या दहा हिंदी चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान त्यांना या चित्रपटाने दिले, असेही दोब्रीयाल ठासून सांगतात.

दीपक दोब्रियाल हे राज आर. गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. या चित्रपटाची संयुक्त निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सने केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करताना दीपक दोब्रियाल म्हणतात, “इथे मला एवढे प्रेम मिळाले की, मी मराठी चित्रपटात काम करत आहे असे मला वाटळेच नाही. जेथे भरभरून सर्जनशील काम होते अशा एका चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मला मिळते आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मराठीतील चित्रपट पाहिल्यावर या चित्रपटसृष्टीचे वेगळेपण लक्षात येते.”

‘बाबा’ हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाबद्दल बोलताना दोब्रीयाल म्हणाले, “माझ्या बारा वर्षांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे संचित मी ‘बाबा’मधून कमावले आहे. मी आतापर्यंत जे हिंदी चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट सरस आहे. या चित्रपटाने मला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सर्वच गोष्टींसाठी मी मराठी चित्रपटसृष्टीचा नेहमीच ऋणी राहीन.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे यापूर्वी दिग्दर्शन केले आहे. ‘बाबा’ची सहनिर्मिती संजय दत प्रॉडक्शन्सने ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांच्याबरोबर केली आहे. ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सने माधुरी दीक्षितची भूमिका असलेल्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.

‘बाबा’मध्ये दोब्रियाल एका मुख्य आणि बहिऱ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. ते म्हणतात की, न बोलता स्वतःला व्यक्त करणे ही बाब त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती.“अशाप्रकारे संपूर्ण चित्रपट चित्रित करणे कठीण होते. सुरुवातीला मला वाटले की, मी केवळ यातील काही दृश्यं चित्रित करू शकतो, पण अशा प्रकारची व्यक्तिरेखा संपूर्ण चित्रपटात साकारणे आणि ती व्यक्तिरेखा जगणे ही बाब अत्यंत आव्हानात्मक अशीच होती,” ते म्हणतात. त्यांना त्यांच्या सहकलाकारांकडून जे सहकार्य आणि मदत मिळाली त्याबद्दल ते भरभरून बोलतात. ते पुढे म्हणतात,“हिंदी चित्रपटांमध्ये तुमचे सहकारी कलाकार कोणती व्यक्तिरेखा साकारत आहेत याबद्दल कोणालाच काही देणेघेणे नसते. अगदी भावनिक दृश्यंही एकमेकांकडे न पाहताच दिली जातात. पण इथे प्रत्येक कलाकार हा त्याची व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे जगत असतो. मला प्रत्येक सहकलाकाराने उत्तम सहकार्य आणि मदत केली. अगदी कलाकारच नाही तर या चित्रपटाशी जोडला गेलेला प्रत्येकजण, प्रत्येक तंत्रज्ञ हा या चित्रपटाबद्दलबरोबर जगत होता.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com