ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन 

hindi marathi actress 88 years old shashikala javalkar passed away
hindi marathi actress 88 years old shashikala javalkar passed away

मुंबई -  हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी दुपारी निधन झाले. आपल्या अभिनयानं एक वेगळं स्थान निर्माण करणा-या शशिकला यांच्या अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर कायम  होती. हसरा चेहरा, कामातील उत्साह, आणि नवोदितांना सतत पाठींबा देण्यात शशिकला यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीतुन मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. आपल्या अभिनयानं एक वेगळी उंची त्यांनी गाठली होती. पूर्वीच्या जमान्यातील आगळ्या वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री म्हणून शशिकला यांचे नाव घ्यावे लागेल. नंतर त्यांनी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली.

शशिकला यांच्या जाण्याची बातमी सर्वप्रथम फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. शशिकला या 88 वर्षांच्या होत्या. राहत्या घरी त्यांचे निधन झाले. बॉलीवूडचा सुवर्णकाळ म्हणून ज्या काळाचा उल्लेख केला जातो. अशा 70 च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा अभिनय म्हणजे एक उत्साह, आणि चैतन्याचा अनुभव असे. अशी भावना त्यांचे सहकलाकार असणा-यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. शशिकला यांनी त्यांच्या चित्रपट विषयक क्षेत्रात जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जवळकर असं होतं. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932  रोजी सोलापुरात झाला होता.

 बालपण मोठ्या कुटूंबात गेलेल्या शशिकला यांना लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं.वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती. त्यांनी आपल्या प्रवासाला वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरुवात केली होती. शशिकला यांनी नौ दो ग्यारह, कानुन, जंगली, हरियाली और रास्ता, अनपढ, यह रास्ते हैं प्यार के, वक्त, देवर, अनुपमा, कभी खुशी कभी गम, चोरी चोरी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com