असं काय घडलं की भांडखोर अर्चना गौतमसोबत लग्न करायचं म्हणतोय शिव ठाकरे,वाचा...Bigg Boss 16, shiv Thakare want to marry archana gautam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 16 shiv Thakare says he is ready to marry archana gautam know why

Bigg Boss 16: असं काय घडलं की भांडखोर अर्चना गौतमसोबत लग्न करायचं म्हणतोय शिव ठाकरे,वाचा..

Big Boss 16 :बिग बॉस 16 मध्ये आतापर्यंत शिव ठाकरे आणि अर्चना गौतम दरम्यानचं नातं अनेक टप्प्यावर बदलताना दिसलं. सुरुवातीला दोघांचं खूप चांगलं पटत होतं. पण त्यानंतर दोघांमध्ये हळूहळू खटके उडू लागले. आता शो चा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये शिवने अर्चनासोबत आपल्या लग्नाचीही गोष्ट बोलून दाखवली. त्याचं झालं असं की.,साजिद खान,अब्दु रोझिक,शिव ठाकरे आणि सुम्बुल तौकीर खान एकत्र बसून मजा-मस्ती करत होते. (Big Boss 16 shiv Thakare says he is ready to marry archana gautam know why)

हेही वाचा: Shraddha Murder Case: 'या' टी.व्ही अभिनेत्याकडे श्रद्धानं मागितलेली मदत, शॉकिंग खुलासा करत म्हणाला...

यादरम्यान साजिद अब्दूला म्हणताना दिसत आहे की,''शिवला विचार तो आपली कॅप्टनशीप कायम राखण्यासाठी अर्चना गौतमशी लग्न करेल का?'', तेव्हा शिव म्हणताना दिसतो की,'' हो,मी करेन. ती माझं प्रेम आहे आणि तिला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही''. शिवचं हे बोलणं ऐकल्यावर साजिद आणि अब्दू हसायला लागतात. आता पहायचं की अर्चनाला जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा तिची काय रिअॅक्शन असेल.

हेही वाचा: Prateik Babbar: 'आईविषयी मनात प्रचंड राग...', स्मिता पाटील यांच्याविषयी हे काय म्हणाला प्रतिक बब्बर?

काही दिवस आधी अर्चना आणि शिवमधील वाद इतका वाढला होता की गोष्ट मारामारीवर आली होती. अर्चनाने शिवचा गळादेखील पकडला होता ज्यामुळे तिला काही काळासाठी बिग बॉसने घराबाहेर काढले होते. माहितीसाठी इथं सांगतो की शिव दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन बनला आहे. तो आधी देखील कॅप्टन बनला होता पण तीन दिवसांतच त्याला त्या पदावरुन पायउतार केलं गेलं होतं. कारण त्याच्या कॅप्टन्सी दरम्यान सदस्यांनी घराचे नियम तोडले होते आणि त्या कारणानं बिग बॉस ने त्याची कॅप्टनशीप रद्द केली होती.

कॅप्टन्सी टास्क दरम्यान जेव्हा अब्दूला दुसऱ्या टीममधून अंकित आणि प्रियंका टास्क देतात तेव्हा साजिद स्वतः अब्दूला टास्क देण्यापासून नकार देताना दिसतो. त्यावेळी प्रियंका,अंकित आणि सौंदर्या साजिदशी भांडताना दिसले. आणि यावेळी साजिद जोरजोरात त्यांच्यावर ओरडताना दिसला. इतकंच नाही तर त्याचा रागावलेला अवतार पाहून त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं गेलं. त्याबरोबर बिग बॉसवर देखील पक्षपातीपणाचे आरोप केले गेले.