मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक चीनमध्ये

मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक चीनमध्ये

मुंबई - सहा वर्षांपूर्वी ‘आई मला मारू नको’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचा हिंदी रिमेक ‘मुझे भी इस दुनिया में आना है’ या वर्षी नोव्हेंबरमध्ये आला. आता हा चित्रपट इंग्रजी व चायनीज भाषेतही डब करण्यात आला आहे. पुढील वर्षी तो चीन व तैवानमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आतापर्यंत ‘दंगल’, ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ असे काही हिंदी चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले असले तरी एका मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक पहिल्यांदाच चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. 

‘आई मला मारू नको’चे दिग्दर्शक सत्यप्रकाश मगतानी चित्रपटाबाबत म्हणाले, की एका मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक चीनमध्ये प्रदर्शित होत आहे याचा आनंद आहे. स्त्री-भ्रूणहत्या ही समस्या जगभर आहे. चीनमध्येही ती मोठ्या प्रमाणावर आहे. 

‘युनिव्हर्सल’ विषयावरील हा  
चित्रपट तेथेही ‘बेटी बचाओ’चा संदेश देईल हे निश्‍चित. ‘आई मला मारू नको’चे वितरण ‘तृप्ती एन्टरटेन्मेंट’ने केले आहे.  ‘तृप्ती एन्टरटेन्मेंट’चे हरेश सांघानी म्हणाले, की मी या चित्रपटाचा कंटेण्ट हाँगकाँगला पाठवला. तेथील चीनमध्ये चित्रपट वितरण करणाऱ्या कंपन्यांना तो कंटेण्ट खूप आवडला. आता पुढील वर्षी तेथील वितरण कंपनी चीन व तैवानमध्ये या चित्रपटाचे वितरण करणार आहे. 

५०० स्क्रीनवर झळकणार 
‘आई मला मारू नको’ या चित्रपटात अविनाश जाधव, मृणालिनी  जांभळे, जयश्री टी., विजू खोटे, शैलेश पितांबरे आदी कलाकार आहेत. तर ‘मुझे भी इस दुनिया में आना है’ या हिंदी रिमेकमध्ये आशय व विषय तोच ठेवून, हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. आता ‘तृप्ती एन्टरटेन्मेंट’ने चीनमध्ये पाठवलेला इंग्रजी व चायनीज भाषेतील हा डब चित्रपट पुढील वर्षी जवळपास चीन-तैवानमधील ५०० स्क्रीनवर झळकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com