'आर्या' म्हणजे नैतिक संघर्ष; दिग्दर्शकानं सांगितलं 'सिग्नेचर एलिमेंट'

ओटीटी माध्यमानं प्रेक्षकांचे आता लक्ष वेधून घेण्यास सुरुवात झाली आहे.
'आर्या' म्हणजे नैतिक संघर्ष; दिग्दर्शकानं सांगितलं 'सिग्नेचर एलिमेंट'

ओटीटी माध्यमानं प्रेक्षकांचे आता लक्ष वेधून घेण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांना या माध्यमाची सवय झाली आहे. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला होता. त्यामुळे अनेक कलाकृती त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म न मिळाल्यानं प्रदर्शित झाल्या नाहीत. मात्र हा प्रश्न ओटीटीनं सोडवला. आता वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळविणारा सर्वात मनोरंजक थ्रिलर बनल्यानंतर, आर्या त्याच्या सीझन 2 सह डिजिटल स्क्रीनवर परतत आहे. ट्रेलरमधील अनेक मनोरंजक ट्विस्टमुळे या सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

आर्याचा दुसरा भाग रिलीज होण्याआधी, राम माधवानी आपल्यासोबत दोन्ही सीझनचे खास घटक शेअर करत आहेत. ते म्हणतात, "आर्या 1 आणि आर्या 2 मधील सिग्नेचर एलिमेंट म्हणजे नैतिक निवड आणि आर्या सामना करत असलेला नैतिक संघर्ष. पहिल्या भागात, तिला आपल्या मुलांचे संरक्षण करायाचे होते. तिने तिच्या वडिलांना तुरुंगात पाठवले आणि मुलगी किंवा बायको पेक्षाही तिने 'आई' हा पर्याय निवडला. हा तिचा मोठा संघर्ष होता. सीझन 2 मध्ये, पुन्हा नैतिक संघर्ष आहे. ट्रेलरमध्ये ती परत आल्याचे दिसत आहे. आता ती इथून पुन्हा निघून जाणार आहे का, तिचे पुढे काय होणार आहे, आता ती कशाची निवड करणार आहे यामध्ये नैतिक संघर्ष आहे आणि त्यामुळे नाट्य आणि तणाव निर्माण होतो. दुसऱ्या भागामध्ये हे महत्त्वाचे आहे."

फॉर्मबाबत बोलायचे झाल्यास, आम्ही सर्व काही 360 मध्ये शूट केले आहे. मला तीन ते चार कॅमेरे वापरायला आवडत नाहीत. मी सर्व कलाकारांसोबत सहज होतो. मला वाटते की सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखा माहित होत्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी म्हणेन की हा एक बोनस होता. "अरे, आर्या असं म्हणणार नाही" किंवा "दौलत तसं म्हणणार नाही" असे म्हणण्याइतपत ते त्यांच्या भूमिकेला ओळखत होते. त्यांना त्यांची पात्रे इतकी चांगली माहीत होती की त्यांच्यासोबत काम करणे खूप आनंददायक होते."

सुष्मिता सेन आर्या सरीनच्या जबरदस्त भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत सिकंदर खेर, विकास कुमार, मायो साराव, अंकुर भाटिया, आकाश खुराना, दिलनाज इराणी हे मुख्य भूमिकेत असतील. आर्याचा दुसरा सीझन, आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या शत्रूंपासून गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेशी लढणाऱ्या आईच्या प्रवासाने सुरू होईल. तिचे कुटुंबच तिची ताकद बनेल की तिचे विश्वासूच तिच्या विरोधात उभे राहतील?. येत्या 10 डिसेंबरला ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com