विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास संघटनेकडून रोख बक्षीस जाहीर

वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
Vijay Sethupathi
Vijay Sethupathi

बेंगळुरू विमानतळावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीवर Vijay Sethupathi एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. संबंधित व्यक्ती हा विजयला लाथ मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किरकोळ वाद असं सांगत अभिनेत्याने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता हिंदू मक्कल काची या गटाचं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. या गटाने विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास १००१ रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. हिंदू मक्कल कचीच्या (इंदू मक्कल कची असंदेखील उच्चारलं जातं) Hindu Makkal Katchi अधिकृत ट्विटर अकाऊंटवर विजय सेतुपतीला मारतानाच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आला आहे. त्यांनी स्वातंत्र्य सेनानी देवथिरू पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर अय्या यांचा आणि देशाचा अपमान केला आहे, असं या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

थेवर अय्या यांचा अपमान केल्याबद्दल अर्जुन संपत यांनी अभिनेता विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास बक्षीस जाहीर केलं आहे, असं या ट्विटमध्ये म्हटलंय. 'इंडिया टुडे'शी बोलताना अर्जुन यांनी आपलं विधान खरं असून ते व्हायरल व्हिडीओशी संबंधित असल्याचं मान्य केलं. "विजयला एअरपोर्टवर मारणाऱ्या महा गांधी या व्यक्तीशी मी बोललो. विजय सेतुपती यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र विजय सेतुपती उपरोधिकपणे म्हणाले की हे राष्ट्र नाही. हे विधान ऐकून महा गांधी आश्चर्यचकित झाले. पण तरीसुद्धा तुम्ही दक्षिणेतील आहात असं म्हणून विजय सेतुपतीला त्यांनी पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर पूजेचं आमंत्रण दिलं. त्यावर पुन्हा विजय सेतुपतीने उपरोधिकपणे उत्तर दिलं. जगातील एकमेव थेवन (देव) म्हणजे येशू आहे, असं विजय म्हणाला. यावरून हा वाद झाला. त्याने पासुम्पोन आणि देशाचा अपमान केला", असं अर्जुन संपत म्हणाले.

Vijay Sethupathi
तृप्ती देसाईंची 'बिग बॉस मराठी ३'मधून एग्झिट; लवकरच राजकारणात प्रवेश

महा गांधी यांच्याशी बोलल्यानंतर विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास बक्षीस जाहीर केल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. जर महा गांधी यांनी केलेला दावा खरं नसेल तर अभिनेत्याने हे आरोप फेटाळले का नाही, असाही सवाल संपत यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com