धाडसी आईची प्रेरणादायी कथा, 'हिरकणी' चा पहिला मोशन पोस्टर रिलिज!

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या सिनेमाचा पहिला मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मराठी दिग्दर्शकांची नेहमीच धडपड चालू असते. सध्या मराठी चित्रपटांमधून वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. नवीन पिढीला गौरवशाली इतिहासाची आठवण करुन देण्यासाठी अनेक चांगले चित्रपट येतात. अशाच एका प्रभावशाली आणि धाडसी आईच्या कथेवर आधारीत चित्रपट घेऊन येत आहे प्रसाद ओक. 'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या सिनेमाचा पहिला मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

"प्रत्येक आई असतेच... हिरकणी" ही टॅगलाईनही वापरण्यात आली. चित्रपटाची ऐतिहासिक कथा आधारीत आहे ती आपल्या बाळासाठी धाडस करणाऱ्या एका आईवर. छत्रपती शिवाजी महाराज आणि खांद्य़ावर बाळाला घेऊन उभी असलेल्या हिरकणीला या मोशन पोस्टरमध्ये दाखविण्यात आलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

आई भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण... महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" येत्या दिवाळीत...२४ ऑक्टोबर रोजी #हिरकणी #Hirkani #24Oct @iradaentertainment in association with @mapuskar (MAGIJ Picture) Presents @hirkanithefilm @chinmay_d_mandlekar @oakprasad Lawrence D'Souza #FalguniPatel

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

सोशल मीडियाद्वारे प्रसाद ओक याने हा पोस्टर अपलोड केला आहे. फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी पेलली आहे. प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. मात्र, यामध्ये कलाकार कोण असणार आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. या पोस्टरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hirkanis first motion poster released