Hollywood: प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पीट घेणार चित्रपटातून संन्यास?|Hollywood Actor Brad Pitt News take long Break | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hollywood Actor Brad Pitt News

Hollywood: प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पीट घेणार चित्रपटातून संन्यास?

Hollywood News: हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पीट हा जगभरात त्याच्या अभिनयासाठी आणि त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. (Brad Pitt) गेल्या काही दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य केले आहे. अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्याही (Hollywood Actor) आहे. सध्या त्यानं एका मुलाखतीमध्ये केलेल्या एका विधानामुळे तो चर्चेत आला आहे. आपण आता हॉलीवूडपासून संन्यास घेणार असल्याचे त्यानं त्या मुलाखतीतून सांगितले आहे. असं काय झालं की ब्रॅडनं एवढ्या टोकाचा निर्णय घेतला हे आपण जाणून घेणार आहोत.

ब्रॅड पीटचे चाहते केवळ हॉलीवूडमध्ये नाही तर ते परदेशात देखील आहे. सोशल (Social Media viral news) मीडियावर देखील त्याचा फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. दोन वर्षांपूर्वी त्याला ऑस्करनं गौरविण्यात आले होते. मात्र त्यानं आता एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यानं तो चर्चेत आला आहे. आपण काही दिवसांनी हॉलीवूडपासून फारकत घेणार असल्याचे या अभिनेत्यानं सांगितले आहे. हॉलीवूडमध्ये तीस वर्षांहून अधिक काळ तो चर्चेत राहिला आहे.

ब्रॅडनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी माझ्या कुटूंबाला सर्वस्व मानतो. माझ्यासाठी ती प्रायोरिटी आहे. कुटूंबाकडे वेळीच लक्ष न दिल्यानं होणारा मानसिक त्रास मला माहिती आहे. त्यामुळे काही गोष्टींबाबत मला निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याचा काळ माझ्यासाठी एखाद्या परिक्षेसारखा आहे. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. मात्र यासगळ्यात त्यानं आपण चित्रपट आणि त्यातील भूमिका यांच्यापासून लांब जाणार याविषयी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

हेही वाचा: KGF स्टार यशची लाईफस्टाईल पाहिलीत का?

ब्रॅड पीटचं अभिनयाशी मोठं नातं आहे. 58 वर्षीय या अभिनेत्याचा प्रवास मोठा संघर्षमय असल्याचे दिसून आले आहे. तो म्हणतो मी चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतो. सध्या वेगवेगळ्या गोष्टींमधून मला एकाकीपण येत असल्याचे जाणवते. अशावेळी ब्रेक घेणं जास्त गरजेचं आहे हेही मला जाणवते. असं ब्रॅडनं म्हटलं आहे.

हेही वाचा: Siddhanth Kapoor Drugs Case: रेव्ह पार्टीतील 'तो' Video viral, मोठा खुलासा

Web Title: Hollywood Actor Brad Pitt News Take Long Break From Acting Interview Viral Retirement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top