आपला पती जगातला सर्वात 'सेक्सी पुरुष' ऐकल्यावर पत्नी म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपला पती जगातला सर्वात 'सेक्सी पुरुष' ऐकल्यावर पत्नी म्हणाली...
आपला पती जगातला सर्वात 'सेक्सी पुरुष' ऐकल्यावर पत्नी म्हणाली...

आपला पती जगातला सर्वात 'सेक्सी पुरुष' ऐकल्यावर पत्नी म्हणाली...

मुंबई - बॉलीवूडच्या अभिनेत्यांची चर्चा केवळ भारतातच होते असे नाही, तर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी त्यांचे चाहते आहेत. याउलट हॉलीवूडच्या अभिनेत्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना बॉलीवूड अभिनेत्यांच्या तुलनेत मिळणार ग्लॅमर यालाही मर्यादा आहे. सध्या जगातील सर्वात सेक्सी पुरुष असा किताब मिळवणाऱ्या एका अभिनेत्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तो अभिनेता अमेरिकेचा आहे. त्याचं नाव पॉल रॅड असं आहे. त्यानं जगातील सर्वात आकर्षक पुरुष अशी ख्याती मिळवली आहे. त्यामुळे सध्या त्याचा मोठया प्रमाणात गवगवा आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

पॉलची जेव्हा सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवड झाली त्याचवेळी त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे देखील जॉन चर्चेत आला आहे. अमेरिकेचा पॉल हा जगात प्रसिद्ध आहे. तो त्याच्या अभिनयामुळे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. केवळ अमेरिकेत नाही तर अमेरिकेच्या बाहेरही त्याला पसंत करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशावेळी पॉलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पॉल आतापर्यत वेगवेगळ्या हॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये चमकला आहे. एका प्रसिद्ध मासिकानं सांगितलेल्या माहितीनुसार य़ावर्षीचा सर्वात सेक्सिएस्ट पुरुष म्हणून पॉलचं नावं घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जेव्हा आपली निवड झाली तेव्हा त्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं सांगितलं की, मला यापूर्वी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्गल मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे. त्यांच्या प्रेमाशिवाय हे काही शक्य नाही. आताही जो पुरस्कार मला मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सर्वात सेक्सी असा पुरस्कार मिळाला हे ऐकून मला आश्चर्य वाटले आहे. पॉल हा 52 वर्षांचा असून त्याला दोन मुलं आहेत. तो एक कॉमेडियन आहे. त्यानं आपल्या पत्नीला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा तिची प्रतिक्रिया बोलकी होती. ती म्हणाली, मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. मला तर हे ऐकूनच धक्का बसला आहे.

पॉलच्या पत्नीची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे. पॉलच्या करिअरची निवड करायची झाल्यास त्याला अँट मॅनच्या भूमिकेपासून ओळखले जाते. याशिवाय त्यानं धीस इज 40 आणि क्ल्युलेस नावाच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

loading image
go to top