esakal | 'होम अँड अवे' फेम अभिनेता डायटर ब्रमर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

dieter Brummer

'होम अँड अवे' फेम अभिनेता डायटर ब्रमर यांचे निधन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले त्या होम अँड अवे फेम अभिनेते डायटर ब्रमर यांचे निधन झाले आहे. ते 45 वर्षांचे होते. होम अँड अवेमध्ये शॅन पॅरिशची भूमिका त्यांनी साकारली होती. ती कमालीची लोकप्रिय देखील झाली होती. ते ऑस्ट्रेलियन अभिनेते होते. न्यु साथ वेल्सच्या पोलिसांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रमर यांचे पार्थिव ग्लेनहेवन येथे आढळून आले. (home and away dieter brummer death at age of 45 yst88)

ब्रमर यांच्या परिवारातील एका सदस्यानं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नुकतचं आम्ही एका प्रतिभाशाली आणि प्रभावी अशा अभिनेत्याला गमावलं आहे. तो त्याच्या मोकळ्या आणि स्वच्छंदी स्वभावासाठी प्रसिद्ध होता. अखेरपर्यत कार्यरत राहणारा अभिनेता म्हणूनही त्याचे नाव घेता येईल. त्याचे जाणे आम्हाला धक्का देणारे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती एका आजारानं ढासळत चालली होती. त्याच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: 'देवा तो तुरूंगातच राहु दे' राजला असं म्हणणारी पुनित कौर आहे कोण ?

1992 मध्ये होम अँड अवे मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रुमर हे घराघरात सगळीकडे चर्चेत आले होते. त्याचे पात्र आणि मेलिसा जॉर्जकडून केलेली भूमिका हे प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होते. आणि त्याची सर्वत्र चर्चाही असायची. त्याच्या या भूमिकेमुळे त्याला दोनवेळा लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

loading image
go to top