आता अशी दिसते 'हेरा फेरी'मधली रिंकू; साकारली होती देवीप्रसादच्या नातीची भूमिका

annanra
annanra

बॉलिवूडच्या इतिहासातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सर्वांत विनोदी चित्रपटांमध्ये 'हेरा फेरी'चं नाव आवर्जून घेतलं जाईल. श्याम, राजू आणि बाबूराव या त्रिकूटाची धमाल मस्ती आणि मनोरंजनाने ठासून भरलेला हा चित्रपट अनेकांच्याच आवडीचा आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शनच्या या चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अशीच एक भूमिका होती १० वर्षांच्या रिंकूची. अलेक्सिया अॅनानरा या मुलीने चित्रपटात रिंकूची भूमिका साकारली होती. अॅनानरा आता मोठी झाली असून सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. आता ती अभिनय क्षेत्रापासून फारच लांब असून पर्यावरण सल्लागार म्हणून काम करतेय. 

'हेरा फेरी' या चित्रपटात अॅनानराने देवीप्रसादच्या (कुलभूषण खरबंदा) नातीची भूमिका साकारली होती. चित्रपटात काही गुंड तिचं अपहरण करतात. तीच रिंकू आता तीस वर्षांची झाली असून सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. अॅनानरा अॅनी म्हणूनही ओळखली जाते. 'हेरा फेरी'शिवाय तिने कमल हासनच्या तामिळ चित्रपटातही भूमिका साकारली होती. 'अवई शानमुगी' या चित्रपटात तिने कमल हासनच्या मुलीची भूमिका साकारली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

या दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अॅनीला चित्रपटसृष्टीलाच रामराम केला. अॅनीने बॉलिवूड किंवा अभिनयक्षेत्रात काम केलेलं तिच्या वडिलांना पसंत नव्हतं असं म्हटलं जातं. म्हणूनच तिने पर्यावरण सल्लागार म्हणून काम करण्यास प्राधान्य दिलं. याचसोबत ती एका स्टार्टअपसाठीही काम करतेय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अॅनीने काही बोल्ड फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. तिने काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com