हृद्यांतरमधून मनीष पॉल मराठीत

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सर्वांना खळखळून हसवणारा होस्ट मनीष पॉल आता विक्रम फडणीस यांच्या हृद्यांतर चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहे. या निमित्ताने विक्रमही मराठीत पदार्पण करणार आहे. मनीष त्याचीच व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारणार आहे. विक्रम आणि मनीष मित्र आहेत. त्यामुळे विक्रमचा शब्द मोडता आला नाही. त्याने लगेचच होकार दिला. मनीषने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांची प्रमुख व्यक्तिरेखा आहे.

सर्वांना खळखळून हसवणारा होस्ट मनीष पॉल आता विक्रम फडणीस यांच्या हृद्यांतर चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहे. या निमित्ताने विक्रमही मराठीत पदार्पण करणार आहे. मनीष त्याचीच व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारणार आहे. विक्रम आणि मनीष मित्र आहेत. त्यामुळे विक्रमचा शब्द मोडता आला नाही. त्याने लगेचच होकार दिला. मनीषने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांची प्रमुख व्यक्तिरेखा आहे. मनीष म्हणाला,""विक्रम प्रतिभावान आहे आणि त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मला आनंद आहे.''युवा पिढीत आणि लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय असल्याने त्याला या भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचे विक्रमने सांगितले .

Web Title: Hrdyantara from Marathi Manish Paul

टॅग्स