Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actor
Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actorGoogle

Hrithik Roshan: हृतिकला सिने-क्षेत्रापासून दूर ठेऊ पाहत होते वडील राकेश रोशन,कारण सांगत अभिनेता म्हणाला..

हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी त्यांच्या काळात अनेक सुपरहिट सिनेमातून काम केले आहे,शिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांनीही मोठी कमाई केलीय.

Hrithik Roshan: हृतिक रोशनचा सिनेमा म्हटला की थिएटरकडे त्याच्या चाहत्यांचे पाय वळलेच पाहिजेत. कितीतरी वेळा जगातील सगळ्यात हॅंडसम पुरुष म्हणून त्याला संबोधलं गेलंय. असा हा हृतिक स्क्रीनवर आला रे आला की अनेक मुलींच्या हृद्यात धडधड होऊ लागतं. पण तो जर सिनेमात नसता आला तर त्यानं काय केलं असतं यासंदर्भात आपण कोणी विचारही केला नसेल. पण अनेक वर्षानंतर हृतिकने आता सांगितलं आहे की वडील राकेश रोशन यांना मुळीच वाटत नव्हतं की हृतिकने सिनेमात यावं. अभिनयात करिअर करावं.(Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actor)

Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actor
Prajakta Mali: गुलाब लाल..आकाश निळं अन् आमची प्राजू..

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हृतिक गेला होता तेव्हा त्याला पाहिल्यावर चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. हृतिक रोशन स्टेजवर जेव्हा गेला तेव्हा तो खूप डॅशिंग दिसत होता, यावेळी हृतिकनं सिनेमा आणि आपल्या अभिनय कारकिर्दिविषयी मनमोकळा संवाद साधला. हृतिकने यावेळी सिनेमाचं बदलतं स्वरुप आणि आपल्या आगामी सिनेमांविषयी देखील संवाद साधला.

Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actor
Manasi Naik: जिंकलस मानसी, घटस्फोटानंतरही असं तेज..

हृतिक म्हणाला, ''मी सिनेक्षेत्रात करिअर करावं याच्याविरोधात माझे वडील होते. कारण इथे काय संघर्ष करावा लागतो हे त्यांनी स्वतः अनुभवलं होतं. राकेश रोशन यांनी आपल्या काळात अनेक सिनेमांतून काम केलं आणि कितीतरी चांगल्या सिनेमात ते दिसले''.

हृतिक पुढे म्हणाला,''माझ्या वडीलांनी २० वर्ष खूप मेहनत केली आणि त्यांना वाटत होतं की माझ्या वाट्याला जे आलं ते माझ्या मुलाला करावं लागू नये. पण मला वाटतं की माझ्या आतमध्ये काहीतरी घडत होतं,ज्यानं मी ठाम निर्णय घेतला होता''.

Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actor
Movie: केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ईराणी दिग्दर्शिकेनं पाठवले कापलेले केस...कारण ऐकाल तर..

हृतिकने अभिनय क्षेत्रात येण्याविषयीच्या आपल्या हट्टाविषयी सांगितले की, ''मला स्वतःला सिद्ध करायचे होते कारण मी लहानपणापासून बोलताना अडखळायचो,एक न्यूनगंड माझ्यात निर्माण झाला होता. आणि सिनेमा हे एकच माध्यम मला वाटलं जिथे मी स्वतःला नॉर्मल म्हणून सिद्ध करू शकत होतो''.

हृतिक पुढे म्हणाला,''मी लहानपणी बोलताना अडखळायचो म्हणून नेहमी एकटेपणा अनुभवलाय. आणि यातनंच मला स्पेशल मुलांसाठी चॅरिटी फाऊंडेशनची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली. मी प्रत्येक स्पेशल चाइल्डमध्ये स्वतःला पाहतो. त्यांच्याशी मी सहज कनेक्ट होतो''.

Hrithik Roshan father rakesh roshan did not want him to become actor
Aamir Khan Secret Affairs: विवाहित असूनही अनेकदा प्रेमात पडलाय आमिर...सीक्रेट अफेअर्सची मोठी यादी

हृतिक असं देखील म्हणाला की, जेव्हा त्यानं करिअर सुरु केलं तेव्हा बॉलीवूड सिनेमांचा स्वतःचा असा एक फॉर्मुला होता,अगदी एखाद्या ठरलेल्या रेसीपीसारखा. कोव्हिड १९ मुळे सिनेमा खूप बदललाय. हृतिक पुढे म्हणाला,''सिनेमा आता अधिक खरा बनलाय. कोरोनामुळे आपल्यात वैचारिक रित्या खूप चांगला बदल झाला आहे. आपण खूप गोष्टींचा विचार करू लागलोय,त्यांना समजून घेऊ लागलोय. आपण चांगल्या गोष्टींची मागणी करतोय,आणि लवकरच त्या गोष्टी घडतील. ही वेळ सगळं पुन्ह्यांदा ठीक करण्याची आहे''.

हृतिक लवकरच दीपिका पदूकोण सोबत 'फायटर' सिनेमात दिसणार आहे. हा एरियल अॅक्शन सिनेमा आहे. हा सिनेमा २५ जानेवारी,२०२४ रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाविषयी हृतिक म्हणाला,''या सिनेमाच्या निमित्तानं खूप मोठी गोष्ट मी करायला जात आहे,आणि ती करण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com