Krrish 4: 'क्रिश ४'ची भरारी लांबणीवर!.. हृतिकनेच संगितलं सिनेमा रखडण्याचं कारण..

ज्या सिनेमाची सारे जण आतुरतेने वाट पाहत होते, त्या क्रिश ४ साठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
hrithik roshan on krrish 4 we are stuck on one technicality we will overcome that by yearend
hrithik roshan on krrish 4 we are stuck on one technicality we will overcome that by yearendsakal

KRRISH 4: नुकतंच हृतिक रोशनने त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. हृतिकचे काही खास सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असाच एक सिनेमा म्हणजे क्रिश. कोई मिल गया, क्रिश आणि क्रिश ३ सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. यानंतर क्रिश ४ ची चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. पण आता 'क्रिश ४' बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

hrithik roshan on krrish 4 we are stuck on one technicality we will overcome that by yearend
Lal Bahadur Shastri: लाल बहादूर शास्त्रींची हत्या की?.. विवेक अग्नीहोत्रींनी असा घेतला शोध..

हृतिक रोशनने माध्यमांशी बोलताना क्रिश ४ बद्दल मोठी गोष्ट सांगितली. "क्रिश ४ बद्दल सर्व गोष्टी ठरल्या आहेत. शुटिंगचं काम सुद्धा पूर्ण झालंय. फक्त टेक्निकल माध्यमांवर काम करणं बाकी आहे. काही अडचणी दूर करायच्या आहेत. अशा सर्व गोष्टींवर काम झालं की, २०२३ च्या अखेरीस सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकेल" असा खुलासा हृतिकने केलाय. त्यामुळे एकूणच क्रिश ४ लांबणीवर गेला असून चाहत्यांना सिनेमाची आणखी वाट बघावी लागणार आहे.

हृतिकने 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'विक्रम वेधा'या सिनेमात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय हृतिक रोशन आता भारतातील पहिला एरिअल ॲक्शन एंटरटेनर सिनेमा 'फाइटर'सह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे. यात हृतिकसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार आहे.

हृतिकने नुकताच १० जानेवारीला त्याचा ४९ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी हृतिकने त्याला भेटायला आलेल्या फॅन्सची बाल्कनीतून भेट घेतली. हृतिकने बाल्कनीतून फॅन्स सोबत सेल्फी काढला. आणि सर्वांचे या आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com