हृतिक-कंगनाचा जुलैमध्ये संघर्ष होणार होता; पण.. 

वृत्तसंस्था
Sunday, 2 June 2019

ह्रतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात पुन्हा एकदा होणारा संघर्ष आता टळला आहे.. गेले अनेक महिने वैयक्तिक आयुष्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात हृतिक आणि कंगना दोघेही आघाडीवरच होते. हृतिकचा महत्त्वाकांक्षी 'सुपर 30' हा चित्रपट 26 जुलै रोजी झळकणार होता. पण कंगनाचा 'मेंटल है क्‍या' हा चित्रपटही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : ह्रतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात पुन्हा एकदा होणारा संघर्ष आता टळला आहे.. गेले अनेक महिने वैयक्तिक आयुष्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात हृतिक आणि कंगना दोघेही आघाडीवरच होते. हृतिकचा महत्त्वाकांक्षी 'सुपर 30' हा चित्रपट 26 जुलै रोजी झळकणार होता. पण कंगनाचा 'मेंटल है क्‍या' हा चित्रपटही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हृतिकने 'सुपर 30'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. 

आता 'सुपर 30' येत्या 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सतत काही ना काही कारणाने पुढे ढकलला जात आहे. याच्या प्रदर्शनाची मूळ तारीख 25 जानेवारी होती. त्याच दिवशी कंगनाचा 'मणिकर्णिका' झळकला होता. 'सुपर 30'चे काही काम रेंगाळल्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळेही चित्रपटाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. 

बिहारमधील 'आयआयटी'साठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर 'सुपर 30' बेतलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hrithik Roshan postpones his Super 30 to avoid clash with Kangana Ranaut