esakal | हृतिकने केले 'सुपर 30' चे नवे पोस्टर रिलिज
sakal

बोलून बातमी शोधा

हृतिकने केले 'सुपर 30' चे नवे पोस्टर रिलिज

- 'Super 30' चे नवे पोस्टर रिलिज.

हृतिकने केले 'सुपर 30' चे नवे पोस्टर रिलिज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन बऱ्याच कालावधीनंतर आता एका दमदार चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सुपर 30' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, सत्यकथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता हृतिकने 'सुपर 30' चे नवे पोस्टर रिलिज केले आहे.

बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यातील शिक्षण देतानाचा संघर्ष या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. हृतिकने या चित्रपटात आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. खऱ्या आयुष्यातील आनंद कुमार पाटणा येथे 'सुपर 30' नावाचे कोचिंग क्लास चालवतात. जेथे गरीब घरातील मुलांना आयआयटीचं ट्रेनिंग दिलं जातं. शिकवणी सोबतच या मुलांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्चही ते उचलतात. याशिवाय कुमार हे 'रामानुजम क्लासेस'ही चालवतात. या क्लासमध्ये पैसे घेऊन शिकवलं जातं. या क्लासमधून येणाऱ्या निधीतून 'सुपर 30' क्लासचा खर्च भागविला जातो.

'Super 30' क्लासमध्ये कुमार हे दरवर्षी घरातील परिस्थिती बेताची अन् गरीब असलेली पण अभ्यासाची ओढ असलेली 30 मुलांची निवड करतात. त्यांना आयआयटीचं शिक्षण देतात. गेल्या पंधरा वर्षात आनंद कुमार यांनी अशाप्रकारे शिकविलेल्या 450 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांना आयआयटी पात्र केलं आहे. 

त्यानंतर आता हृतिकने 'Super 30'चे नवे पोस्टर रिलिज केले. यामध्ये त्याने आपले दोन विद्यार्थी कुसूम आणि केशव यांची परिस्थिती मांडली.

loading image
go to top