#WarTrailer हृतीक-टायगरच्या अॅक्शनचा थरार, ट्रेलर रिलीज

टीम ईसकाळ
Tuesday, 27 August 2019

मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांची ऑनस्क्रीन अॅक्शन आता चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'वॉर' या चित्रपटात हे दोन स्टार्स एकमेकांना भिडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्ट झाला. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर खूप कमी वेळात हा ट्रेलर सोशल मीडियावर हीट झाला आहे. #WarTrailer आणि #HrithikvsTiger हे दोन हॅशटॅग सकाळपासून ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत.

कबीर (हृतीक रोशन) आणि खालीद (टायगर श्रॉफ) यांच्यामधील युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कबीरचा शिष्य असलेला खालीदनंतर त्याच्याच जीवावर उठतो, पण काही कारणाने ते दोघे एकत्र येतात असे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. वाणी कपूरही या चित्रपटात दिसेल. अॅक्शन, मसाला, हृतिक-टायगरचा 'वॉर' या सर्व गोष्टींमुळे या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.   

'वॉर' 2 ऑक्टोबरला रिलीज होईल. आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या या अॅक्शनपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hritik Roshan Tiger Shroff War movie trailer launched today