चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात! हृता दुर्गुळेची नाराजी

हृताने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने मनातली खंत व्यक्त केली.
hruta durgule participate in bus bai bus show on zee marathi she said movie artist attitude is bad for serial artist
hruta durgule participate in bus bai bus show on zee marathi she said movie artist attitude is bad for serial artist SAKAL
Updated on

hruta durgule : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार पंकजा मुंडे अशा अनेक दिग्गज महिला कलाकार सहभागी झाल्या आहेत. आता या कार्यक्रमात तरुणाची क्रश, मोस्ट ब्युटीफूल आशा अभिनेत्री हृता दुर्गुळेने हजेरी लावली. यावेळी तिने मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या वर्तनाबद्दल मोठे विधान केले. (hruta durgule participate in bus bai bus show on zee marathi she said movie artist attitude is bad for serial artist)

हृताने आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका केल्या. 'दूर्वा' या मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तरुणांच्या पसंतीस उतरलेल्या फुलपाखरू मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली. हि मालिका इतकी गाजली कि बघता बघता हृताचा चाहतावर्ग मोठ्या संख्येने वाढला. त्यानंतर तिने झी मराठी वरील 'मन उडू उडू झालं' हि मालिका केली. नुकताच या मालिकेने निरोप घेतला, पण या मालिकेने यशाची प्रचंड उंची गाठली. दरम्यान हृताने 'टाइमपास ३' आणि 'अनन्या' असे दोन चित्रपट केले. त्यामुळे हृताची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकतीच हृताने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने मोठ्या पडद्यावरील कलाकार छोट्या पडद्यावरील कलाकारांना कमी समजतात, अशी खंत व्यक्त केली.

हृता आणि तिच्या सासूबाई मुग्धा शाह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याचा एक प्रोमो नुकतंच समोर आला आहे. यावेळी अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली. मोठ्या पडद्यावरील कलाकार छोट्या पडद्यावरील कलाकारांना कमी समजतात का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली.. 'होय, खरं आहे. मी कुणाचंही नाव घेणार नाही. पण हा अनुभव आहे. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून हा फरक जाणवून देतात.' असं म्हणत हृताने आपली नाराजी सर्वांसमोर मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com