मला जुनी अंजली भाभी कसे होता येईल ?  

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 20 October 2020

 टेलिव्हिजनवरील फार कमी मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा ही होय. मात्र या मालिकेतील  काही कलाकारांनी ही मालिका आता सोडली आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये आता अंजली भाभीची भूमिका सुनैना फौजदार साकारत आहे.

मुंबई - टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका असणा-या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील अंजली मेहता या पात्राची भूमिका करणा-या नेहा मेहता यांनी काही कारणांमुळे ही मालिका सोडली. यावेळी गेल्या 12 वर्षांपासून ती भूमिका करणा-या अंजली भाभींच्या जागी कोण येणार याची चर्चा होती. आता या मालिकेत अंजली भाभीची भूमिका सुनैना फौजदार करणार आहेत. मात्र त्य़ांनी दिलेल्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय ठरत आहे.

टेलिव्हिजनवरील फार कमी मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा ही होय. मात्र या मालिकेतील  काही कलाकारांनी ही मालिका आता सोडली आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये आता अंजली भाभीची भूमिका सुनैना फौजदार साकारत आहे.  सुनैनाने याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवीन माहिती शेयर केली आहेय त्यात तिने, तारक मेहतामधील नव्या अंजली भाभीला जुन्या अंजली भाभी बरोबर तुलना करता येणार नाही. असे म्हटले आहे. १२ वर्षापासून अंजली भाभीची भूमिका नेहा मेहता साकारत होत्या. पण आता ही भूमिका सुनैना फौजदार ही करत आहे.

लॉकडाऊन नंतर चित्रीकरण सुरु झाले झाल्यावर नेहा मेहता यांनी मालिका सोडत असल्याचे सांगितले.  काय चांगले आणि काय वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना  आहे. त्यांच्यामुळे आपण आहोत हे लक्षात घ्यायला हवे. माझी या अगोदरच्या अंजली भाभी यांच्याशी तुलना होणे स्वाभाविक आहे. याचे कारण म्हणजे या मालिकेची लोकप्रियता हे आहे. खरोखरच या मालिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले आहे. प्रेक्षकांनी कौतुक केल्याचे ऐकून जसे आपण सुखावतो, तसेच त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेसाठी सुद्धा तयार राहिले पाहिजे, असेही सुनैना सांगते.

यापुढे मला माझे स्वत:चे स्थान निर्माण करुन पुढे जायचे आहे, "मी आज माझ्या चाहत्यांमुळे इथे आहे. तुझा आवाज असा आहे किंवा अन्य गोष्टींबद्दल बोलतात. वेगवेगळया प्रकारची तुलना करता येते. मी इथे कोणाची जागा घ्यायला आलेली नाही. मी माझी स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी आल्याचेही सुनैनाने यावेळी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I cannot become Neha Mehta can entertain as me