धर्मेंद्रजी यांच्यासाठी खास वेळ काढू शकले नाही याची खंत

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मानधन आहे, प्रसिध्दी आहे या तुम्ही साईन केलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे हे काही फार महत्वाचे नाही. हे लक्षात घ्यायला हवे. मी ब-याचदा माझ्या सेटवर सर्व सहका-यांसमवेत केक कापून बर्थ डे साजरा केला आहे. आता मोठे सेलिब्रेशनसाठी मोठे कुटूंब आहे.

मुंबई - बॉलीवूडची ड्रीम गर्ल असणा-या हेमा मालिनी यांचा आज जन्मदिवस. 72 व्या वर्षात पदार्पण करणा-या हेमाजींचा लुक अजूनही कमालीचा सुंदर आहे. कोणेएकेकाळी तरुणांच्या मनात घर केलेल्या या अभिनेत्रीने बॉलीवूडचा ही मॅन धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला. त्यांचा संसारही सुरळीत सुरु आहे. मात्र सतत बिझी वेळापत्रक असणा-या खासदार हेमा मालिनी यांना त्यांच्या फॅमिलीसाठी पुरेसा वेळ देता आला नसल्याची खंत वाटते आहे.

हेमाजींची चित्रपट कारकीर्द मोठी आहे. विशेष म्हणजे अजूनही त्या या माध्यमात कार्यरत आहेत. जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या बॉलीवूडच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, मी त्यावेळच्या अभिनेत्रींमधील एक सुपरस्टार अभिनेत्री होते, मला त्यांच्याहून अधिक मानधन होते, माझ्या नावावर अनेक चित्रपट तयार होत होते, यासगळ्या गोष्टींचा विचार मी कधीही केला नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात सहभागी असणा-या सर्वांशी प्रेमाने आणि आपूलकीने वागणे हे तत्व कायम लक्षात ठेवले. ते आचरणातही आणले. तो काळ 1970 ते 1980 चा होता. सगळे काही झपाट्याने बदलत चालले होते. त्याचे पडसाद चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत होते.

तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मानधन आहे, प्रसिध्दी आहे या तुम्ही साईन केलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे हे काही फार महत्वाचे नाही. हे लक्षात घ्यायला हवे. मी ब-याचदा माझ्या सेटवर सर्व सहका-यांसमवेत केक कापून बर्थ डे साजरा केला आहे. आता मोठे सेलिब्रेशनसाठी मोठे कुटूंब आहे. मुलगी, जावई हे आनंदाने सगळ्या गोष्टी करतात. त्याचे समाधान वाटते. यापेक्षा माझी काही आणखी अपेक्षा नाहिये. एक सुपरस्टार झाल्यानंतर तुम्हाला जे काही बदलावेसे वाटते ते बदलता येते असे समजणे चूकीचे आहे. माझे लग्न झाल्यापासून मला माझे पती धर्मेंद्र यांना पुरेसा वेळ देता आला नाही याची खंत वाटते. पण जो काही वेळ आम्हाला मिळाला तो आम्ही आनंदाने व्यतीत केला.

तुला यायला उशीर का झाला, असे का केले नाही, अशीच का वागलीस, खरं सांगायचे तर हे प्रश्न आम्हाला कधी पडले नाहीत आणि त्यावरुन आमच्यात वादही झाले नाहीत हे यानिमित्ताने सांगायला हवे. माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर असताना मी कधीही तक्रारीत वेळ घालवला नाही. असेही हेमा मालिनी यांनी सांगितले. बॉलीवूडमधल्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हिट चित्रपट देणा-यांच्या यादीत त्यांचे नाव सुरुवातीला घ्यावे लागेल. अशी एक चर्चा  होती की, त्यावेळचे सुपरस्टार देव आनंद, मनोज कुमार आणि राजेश खन्ना यांनी अनेकदा आपल्या चित्रपटांत काम करण्यासाठी त्यांना विनंती केली होती. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Didnt Get To Spend Enough Time With Dharamji