Tunisha Sharma: मी निर्दोष! न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास.. आरोपी शिझान खानची प्रतिक्रिया

तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणी आरोपी शिझान खान सध्या अटकेत आहे.
I have faith in judiciary, Satyamev Jayate... says accused Sheezan Khan in tunisha sharma suicide case
I have faith in judiciary, Satyamev Jayate... says accused Sheezan Khan in tunisha sharma suicide case sakal

unisha Sharma Suicide Case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. तुनिषाच्या आईनं एका पत्रकार परिषदेमध्ये शिझानवर टोकाचे आरोप केले. शिझान हाच तुनिषाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे तुनिषाच्या आईनं म्हटले. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुख्य आरोपी म्हणून शिझानला पोलिसांनी अटक केले आहे. शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने एक मोठे विधान केले.

(I have faith in judiciary, Satyamev Jayate... says accused Sheezan Khan in tunisha sharma suicide case)

I have faith in judiciary, Satyamev Jayate... says accused Sheezan Khan in tunisha sharma suicide case
Bigg Boss Marathi 4: शेवटचं एलिमिनेशन अन् प्रसाद जवादे घराबाहेर..

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं शुटिंगच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि कोअॅक्टर शीझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

I have faith in judiciary, Satyamev Jayate... says accused Sheezan Khan in tunisha sharma suicide case
Hemangi kavi: २०२२ या वर्षात हेमांगीनं नेमकं केलं तरी काय? तिनंच सांगितलं सविस्तर..

शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा सध्या शझानची बाजू मांडत आहेत. shशनिवारी त्याला वसई कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खाननं आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्याने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, "माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे. 'सत्यमेव जयते..!"

शिझानचे वकील मिश्रा यांनी सांगितले की, शीझान (आज) सोमवारी कोर्टात या खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहे. आम्ही खटल्याशी संबंधित काही प्रमाणित कागदपत्रांसाठी अर्ज केला आहे. ती मिळाली की, सोमवारी सकाळी जामीन अर्ज दाखल करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com