एकाही निवडणुकीत मी मतदान चुकवलं नाही : रेणूका शहाणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सध्या निवडणुकीचा मोसम जोरात असल्याने विद्या बालन यांनी संवाद साधला गुणी अभिनेत्री रेणूका शहाणे यांच्याशी, अशी अभिनेत्री जी आपलं मत न लाजता स्पष्टपणे मांडते. त्या सांगताहेत मतदानाचं महत्त्व.

आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मानसन्मान आणि प्रचंड कौतुक मिळवणाऱ्या विद्या बालन यांनी आजवर प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांची कधीच निराशा केली नाही. सध्या त्या आयुष्यातील एक नवा अध्याय म्हणजेच आरजे होण्याचा आनंद घेताहेत. आयुष्यात पहिल्यांदाच त्या हे काम करताहेत मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन’ या 92.7 बिग एफएमवरच्या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाचं व्यासपीठ वापरून त्या समाजावर परिणाम करणाऱ्या अनेक विषयांकडे श्रोत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या निवडणुकीचा मोसम जोरात असल्याने विद्या बालन यांनी संवाद साधला गुणी अभिनेत्री रेणूका शहाणे यांच्याशी, अशी अभिनेत्री जी आपलं मत न लाजता स्पष्टपणे मांडते. त्या सांगताहेत मतदानाचं महत्त्व.

मतदानाच्या महत्त्वाबद्दल विचारल्यावर रेणूका शहाणे म्हणाल्या, 'एखाद्या मतदाराला कदाचित असं वाटू शकतं की एका मताने काहीच फरक पडणार नाही, पण असंही होतं की उमेदवार एका मताने विजयी किंवा पराभूत होतो. मतदानामुळे नागरिकांना त्यांच्या आवडीचं सरकार निवडण्याचा अधिकारच मिळत नाही तर आपल्यासारख्या लोकशाही देशात आपलं मत व्यक्त करण्याची संधीही मतदाराला मतदानाच्या माध्यमातून मिळत असते. आपल्या देशाने दिलेले अधिकार आपण बिनधास्तपणे वापरतो पण आपली कर्तव्य पार पाडताना पळपुटेपणा करतो'

मतदानाविषयीच्या अनुभवाबद्दल विचारल्यावर त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, "मी अभिमानाने सांगू शकते की मी 18 वर्षांची झाल्यापासून मतदान करत आहे. त्यानंतर एकाही निवडणुकीत मी मतदान केलं नाही असं झालेलं नाही, मग ती महानगरपालिकेची, विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक असो."

लोकांना मतदानाला जाण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मतदानावर आणि मतदान करण्याच्या कारणावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, "माझ्या नवऱ्याचं मतदान ओळखपत्र मध्य प्रदेशातलं आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला तो तिथे जातो आणि त्याचं मतदान नीट होईल याची काळजी घेतो. माझा मुलगा आता 16 वर्षांचा आहे, दोन वर्षांनंतर त्याला मतदान करायची संधी मिळेल याबाबत तो खूप उत्सुक आहे. असाच उत्साह प्रत्येकात असायला हवा. प्रत्येकाच्या घराच्या जवळच मतदान केंद्र असतात. त्यामुळे कृपया घरातून बाहेर पडा आणि मतदानाचा आनंद अनुभवाहो, तुम्हाला रांगेत उभं रहावं लागेल, पण जर तुम्ही तुमचं मत व्यक्त करण्यासाठी तेवढंही करू शकत नसाल तर येणारी 5 वर्षं तुम्हाला तुमचं मतंच नसेल'

मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन सादरकर्ते मथूट फिनकॉर्प हा बिग एफएमवरील नवा कार्यक्रम असून ज्यातून समाजावर परिणाम करणारे मुद्दे सर्वांसमोर मांडले जातात.दररोज संध्याकाळी 7 ते 9 हा कार्यक्रम प्रक्षेपित होतो. शनिवारी व रविवारी त्याचे पुन:प्रक्षेपण केले जाते. त्याचबरोबर एक विशेष महत्त्वाचा कार्यक्रम – मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन सादरकर्ते मुथूट फिनकॉर्प स्पॉटलाइट प्रक्षेपित होतो सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I voted in every election without fail says Renuka Shahane