
Bigg Boss 16 MC Stan: मी पुन्हा तिच तोंड बघणार नाही.. विजेता झाल्यावर एम.सी.स्टॅन कोणावर भडकला
Bigg Boss 16 MC Stan News: बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले नुकतीच झाली. सलमान खानने त्याच्या हटके शैलीत बिग बॉस १६ चं सूत्रसंचालन केलं. बिग बॉस १६ चा विजेता झाला एम.सी.स्टॅन. स्टॅन त्याच्या शांत तरीही आक्रमक स्वभावामुळे घरात चर्चेत राहिला.
स्टॅनचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. फॅनच्या प्रचंड वोट्स मुळे स्टॅनने बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं.
(I won't see her same again.. Who did MC Stan get angry at after winning bigg boss 16)
बिग बॉस नंतर स्टॅन एका व्यक्तीवर नाराज आहे. स्टॅनने मुलाखतीत याचा उलगडा केला. बिग बॉस १६ मधील मंडली खास चर्चेत राहिली. या मंडली मध्ये अब्दु रोजिक, साजिद खान, स्टेन, शिव ठाकरे, सुंबुल तौकीर आणि निम्रित कौरअहलुवालिया यांचाही समावेश आहे.
स्टॅन जिंकल्यानंतर मंडलीला विशेष आनंद झाला. स्टॅन म्हणतो की, "सर्व मंडली बिग बॉस नंतर संपर्कात राहतील."
जेव्हा स्टॅनला विचारलं की घरातील असं कोण आहे ज्याच्या संपर्कात राहणे त्याला आवडणार नाही. या प्रश्नावर स्टॅन म्हणाला,
“अर्चना (गौतम) कारण ती काही मिनिटांत लगेच बदलते. अर्चना हि अशी व्यक्ती आहे, जी मला कधीच समजली नाही. खरं तर, मंडलिशिवाय, मी इतरांच्या संपर्कात राहणार नाही.” असं स्टॅन म्हणाला
एम.सी. स्टॅन आणि अर्चना गौतम यांची घरात असताना जोरदार भांडण झाली. स्टॅन संध्याकाळी रस्त्यावर झाडू मारतो आणि फुकटचं जेवतो असं अर्चना त्याला म्हणाली.
तर स्टॅनने सुद्धा अर्चनाला बापावरून वेगळ्या शब्दात टीका केली होती. दोघांचे अत्यंत टोकाचे वाद झाले. एका भांडणात स्टॅन अर्चनामुळे रडला होता.
एम. सी. स्टॅन हा पुण्यातील ताडीवाला रोडवर राहणारा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याने ' बिग बॉस 16" च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता अमरावतीच शिव ठाकरे हा फर्स्ट रनर अप ठरला आहे.
स्वप्न बघितली कि ती पूर्ण होतात हे एम सी स्टॅनने जगाला दाखवून दिलं. एम सी स्टॅनचे जगभरातले फॅन्स त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.