Video Viral : सैफ अली खानचा लेक कोणाला करतोय डेट ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Saif Ali Khan's son Ibrahim Khan's video viral on social media

Video Viral : सैफ अली खानचा लेक कोणाला करतोय डेट ?

सैफ अली खान जेवढा चर्चेत आहे तेवढाच त्याच्या मुलाचीही चर्चा मीडियामधे चालते.सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय.एका बॉलीवूड अभिनेत्रीसोबत इब्राहिम स्पॉट झाला आणि त्यांचा तो व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला.याआधीही इब्राहिमच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या.

बी-टाऊनमधील कलाकार मंडळी असो वा स्टारकिड्स त्यांचं खाजगी आयुष्य चर्चेचा विषय ठरतं.ते जितके त्यांच्याबद्दल लपवण्याचा प्रयत्न करतात तेवढेच चर्चेत येतात.याआधी इब्राहिम श्वेता तीवारीची मुलगी पलक हिला डेट करतो आहे अशा चर्चा उडाल्या होत्या.ही चर्चा सुरू असतानाच या दोघांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला.(Viral Video)या फोटोमध्ये पलक चेहरा लपवताना दिसली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.या व्हिडीओमध्ये पलक एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. पलक तिच्या कारमध्ये बसताच पाठोपाठ इब्राहिम देखील त्याच्या मित्रांबरोबर त्याच रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांनी जोर धरला आहे.

पलकने या व्हिडिओमधे पाढऱ्या रंगाचा टॉप,हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केलाय.पण यावेळी पलकने तिचा चेहरा न लपवता कॅमेऱ्याकडे हसत पाहिलं आहे. इब्राहिम-पलकच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला असला तरी याबाबत दोघांनीही सध्यातरी काही उघड केलेलं नाही.

एका मुलाखतीदरम्यान पलकला इब्राहिमसोबत असलेल्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, “आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. लोकं जे बोलतात त्या निव्वळ अफवा आहेत. म्हणूनच मी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. आम्ही आमच्या मित्र-मैत्रिंणींबरोबर बाहेर गेलो होतो. पण माझे आणि इब्राहिमचेच फोटो व्हायरल झाले. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.” इब्राहिमसोबत फक्त मैत्री असल्याचं पलकने त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

Web Title: Ibrahim Khan Video Wioth Palak Tiwari Viral On Social Media Relationship Gossips Are Going On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top