esakal | अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, 'जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर मी..'
sakal

बोलून बातमी शोधा

anurag tapsee

बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे.तापसी पन्नू देखील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे अनुरागचं समर्थन करत आहेत.

अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, 'जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर मी..'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक शोषणनंतर आता बलात्काराचा आरोप लावला आहे. या आरोपांनंतर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे.तापसी पन्नू देखील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे अनुरागचं समर्थन करत आहेत.

हे ही वाचा: अनुराग कश्यपवर पायल घोषने केला बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल  

अभिनेत्री तापसी पन्नूने अनुरागचं समर्थन करत म्हटलं होतं तो महिलांचा खूप आदर करतो आणि तरीही जर तो लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळून आला तर मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकेन. तापसीने मुंबई मिरर सोबत बोलताना म्हटलं की 'अनुराग कधीच कोणत्या व्यक्तीबाबत वाईट बोलला नाही भले ती व्यक्ती त्याच्या आवडीची नसली तरी.' तापसीने म्हटलं की 'अनुरागच्या सेटवर कित्येक महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात जे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. जर कोणा व्यक्तीचं शोषण झालं असेल तर प्रकरणाचा तपास सुरु झाला पाहिजे. सत्य समोर येईल.'

याविषयी अधिक बोलताना तापसी म्हणाली, 'जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर ती पहिली व्यक्ती असेल जी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकेन. मीटू मुवमेंट अशा प्रकारे भटकवणं महिलांसाठी योग्य नाहीये.' याआधी देखील तापसीने अनुरागला पाठिंबा देत म्हटलं होतं की 'अनुराग माझ्या मित्रा मला माहितीये की तु सगळ्यात जास्त स्त्रीवादी आहेस. लवकरंच आपली सेटवर पुन्हा भेट होईल. तुझ्या कामातुन तु दाखवून देतोस की या जगात महिला किती शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहेत. '    

if anurag kashyap is found guilty then i shall will break all ties with him says taapsee pannu