तर मग माझे चित्रपट पाहू नका; पुरुषी मानसिकतेवर मलिका शेरावतची टीका

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

महिलांवर अत्याचार होण्यात मलिकाच्या चित्रपटांचा वाटा अधिक आहे. अशा स्वरुपाचे आरोप सोशल मीडियातून विशेषत; टविटरवरुन होत असल्याने त्याला प्रत्युत्तर मलिकाने दिले आहे. 

मुंबई - आपल्या बोल्ड अशा व्यक्तिमत्वामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणा-या अभिनेत्री मलिका शेरावतने परंपरागत चालत आलेल्या पुरुषी मानसिकतेवर सडकून टीका केली आहे. महिलांवर अत्याचार होण्यात मलिकाच्या चित्रपटांचा वाटा अधिक आहे. अशा स्वरुपाचे आरोप सोशल मीडियातून विशेषत; टविटरवरुन होत असल्याने त्याला प्रत्युत्तर मलिकाने दिले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अमानुष बलात्काराचे पडसाद कायम असताना देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. यासाठी पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था यावर सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान एकाने महिलांवर होत असलेल्या अत्याचारासाठी अभिनेत्री मलिका शेरावतच्या चित्रपटांना दोषी धरले आहे. तसेच या अत्याचारांत तिचाही अप्रत्यक्षरीत्या सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्या नेटक-याला मलिकाने चांगलेच सुनावले आहे.

भारतात महिलांवर जे काही अत्याचार होतात त्याला माझे चित्रपट कारणीभूत आहेत असे वाटणा-यांना मला परखड भाषेत उत्तर द्यायचे आहे. देशातील महिलांवर होणारे बलात्कार माझ्या चित्रपटांमुळे म्हणणा-यांच्या पुरुषीपणाची मला चीड येत आहे. अशाप्रकारची मानसिकता असणा-यांनी ती बदलण्याची गरज आहे. अद्यापही आपल्या देशातील एका विशिष्ट काळातील मानसिकता आणि त्याप्रमाणे विचार करण्याची सवय गेलेली नाही. त्यात फारसा फरकही पडलेला नाही. मलिकाने तिच्या चित्रपटात ज्याप्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत त्यात तिची भूमिका कायम स्त्रियांवर होत असलेले अन्याय आणि अत्याचार याप्रकारची आहे. असे संबंधित नेटक-याने तिला विचारले आहे.

यावर तितक्याच परखडपणे मलिकाने प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली, माझे चित्रपट जर हे बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्यास अशाप्रकारे विचार करणारी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. यामुळेच अजूनही आपण महिलांच्याबाबत विचार करताना प्रतिगामी आहोत. आणि कुणाला माझ्या चित्रपटांचा त्रास वाटत असल्यास त्याने ते पाहू नयेत. या शब्दांत तिने सुनावले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you have a problem with my movies then Don’t see them said by malika sheravat