बापरे ! दीपिकाच्या 'या' बॅगची किंमत ऐकुन तुम्हीही व्हाल थक्क

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सेलिब्रिटींच्या बॅगविषयी बोलायचं तर एकापेक्षा भारी आणि महागड्या बॅगची जणू शर्यतच लागली आहे. दीपिका पदूकोन सध्या तिच्या अशाच एका बॅगमुळे चर्चेत आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये फॅशन, स्टाइल आणि ग्लॅमरला किती मह्त्तव आहे आपण जाणताच. त्यामुळे स्वत: अपडेटेड आणि फॅशनमध्ये पुढे ठेवण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार काही करु शकतात. या कलाकारांचे एअरपोर्ट लुक, पार्टी लुक, वेकेशन लुक असं सर्वच काही कॅप्चर केलं जातं. त्यामुळे हे स्टार आपल्या लुकसाठी लाखो काय कोटी रुपये खर्च करण्यासाठीही तयार असतात. त्यामुळे अभिनेत्री स्टारडम टिकवण्यासाठी अनेकदा लाखो रुपये खर्च करताना दिसतात, शॉपिंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक ड्रेस, अॅक्सेसरीज, शुज, पर्स हे ब्रॅंडेड आणि हटके असतं. खासकरुन सेलिब्रिटींच्या बॅगविषयी बोलायचं तर एकापेक्षा भारी आणि महागड्या बॅगची जणू शर्यतच लागली आहे. दीपिका पदूकोन सध्या तिच्या अशाच एका बॅगमुळे चर्चेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

it’s the time to disco!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

अभिनेत्री दीपिका पदुकोन तिच्या एअरपोर्ट लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. पॅपराझी तिची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी धडपड करत असतात. नुकतचं दीपिकाला बंगळुर एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती कॅज्युअल तरीपण क्लासी लुकमध्ये दिसली. नेडमीप्रमाणे ती मोठ्या गोग्लस आणि बेसिक मेकअपमध्ये दिसली. ऑफ व्हाईट कलरच्या टर्टल नेक टॉप आणि हायवेस्ट ट्राइझरमध्ये ती दिसली. तर, तपकीरी रंगाच्या हिल्समधला आणि हेअर बन असा तिचा लुक क्लासी वाटत होता. एकुणच तिचा लुक न्युड कलरच्या कॉम्बनेशनचा दिसत आहे. या लुकला पूर्ण करण्यासाठी तिने ब्राऊन रंगाची बॅग कॅरी केली. हा लुक न्ककीच लक्ष वेधून घेणारा आहे. याच बॅगची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते.
दीपिकाने कॅरी केलेली ही बॅग लुई वितों (Louis Vuitton carryall bag coated with canvas and VVN)ची ट्रॅव्हलर बॅग होती. ज्याची किंमत जवळपास 1 लाख 22 हजार 860 रुपये असल्याचं बोललं जात आहे. याआधीही  बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या बॅगच्या किंमतींमुळे चर्चेत आल्या आहेत. इंटरनेटवर सध्या दीपिकाच्या बॅगची चर्चाच पाहायला मिळत आहे. 

दीपिका सध्या मेघना गुलजारच्या 'छपाक' या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांना भेटणार आहे. अॅसिडस हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवाल हिच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. त्याचा पोस्टरही तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. रणवीर आणि दीपिका यांनी संजय लीला भव्साळी यांच्या रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या तीन चित्रपटांमधून एकत्र काम केले. लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी 83 या चित्रपटामधून एकत्र दिसणार आहे.हा सिनेमा 1983 मध्ये भारतीय क्रिकेट टीमनं मिळवलेल्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

& on to the next...Thank You @kabirkhankk for this incredible honour...! #RomiDev #Day1 @83thefilm @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you heard price of deepika s this bag you will be shocked