IIFA Award: कोणत्या सिनेमानं मारली बाजी? सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण?

दुबईतील अबुधाबीतील आयफा 2022 शो मध्ये बॉलीवूडच्या सिनेतारकांच्या परफॉर्मन्सला कमाल केली.
Shershaah Wins Big, Vicky Kaushal Is Best Actor And Kriti Sanon
Shershaah Wins Big, Vicky Kaushal Is Best Actor And Kriti Sanonesakal
Updated on

IIFA 2022 : दुबईतील अबुधाबीतील आयफा 2022 शो मध्ये बॉलीवूडच्या सिने तारकांच्या परफॉर्मन्सला कमाल केली. गेल्या दोन वर्षांपासुन या शो वर कोरोनाचे (IIFA Award 2022 ) सावट होते. यंदाच्या वर्षी मात्र हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसन आले. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यानं या (Salman Khan) सोहळ्याचे होस्टिंग केले तर कियारा अडवानी, विकी कौशल, शाहिद कपूर, नोरा फतेही, दिव्या खोसला कुमार यांच्या परफॉर्मन्सनं चाहते (Entertainment News) भारावून गेले. दरम्यान सलमानच्या उद्धटपणाचा अनुभव यावर्षीच्या सोहळ्यात सिद्धार्थ कन्नननं या होस्टनं घेतला. त्यावरुन सलमानवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या कलाकारानं बाजी मारली, कोणत्या चित्रपटाचा वरचष्मा राहिला हे आपण जाणून घेणार आहोत.

आयफा 2022 मध्ये नव्या पिढीच्या कलाकारांना गौरविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, शर्वरी वाघ यांची नावं घेता येतील. शर्वरीला बंटी और बबली 2 मधील तिच्या अभिनयासाठी बेस्ट डेब्यु फिमेल अॅक्टेसचा पुरस्कार मिळाला. यंदाच्या सोहळ्यामध्ये ज्या कलाकारांना गौरविण्यात आले त्यांची नावे व त्यांना मिळालेला पुरस्कार याची यादी खालीलप्रमाणे आहे...

Shershaah Wins Big, Vicky Kaushal Is Best Actor And Kriti Sanon
IIFA 2022: 'सलमान तुला एवढा कसला रे गर्व!' नेटकऱ्यांची सडकून टीका, कारण...

सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेरशहा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विष्णु वर्धन, शेरशहा

सर्वोत्कृष्ट अभिनेता - विकी कौशल - सरदार उधम

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कियारा अडवाणी - शेरशहा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी, लुडो

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सई ताम्हणकर, मिमि

बेस्ट डेब्यु मेल - अहान शेट्टी - तडप

बेस्ट डेब्यु फिमेल - शर्वरी वाघ, बंटी और बबली २

सर्वोत्कृष्ट गायक - जुबीन नौटियाल, राते लंबीया - शेरशहा

सर्वोत्कृष्ट गायिका - असीस कौर - राते लंबीया - शेरशहा

सर्वोत्कृष्ट संगीत - ए आर रहमान - अतरंगी रे, तनिष्क बागची, जसलीन रॉयल - शेरशहा

सर्वोत्कृष्ट गीतलेखन - कौसर मुनीर - 83

सर्वोत्कृष्ट कथा - अनुराग बसु - लुडो

सर्वोत्कृष्ट कथा (अॅडप्टेट) - 83

सर्वोत्कृष्ट पटकथा - संदीप श्रीवास्तव - शेरशहा

सर्वोत्कृष्ट संवाद - अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागु - थप्पड

Shershaah Wins Big, Vicky Kaushal Is Best Actor And Kriti Sanon
IIFA Viral: बच्चन परिवाराचा डान्स चर्चेत, नेटकऱ्यांकडून वाहवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.