अभिनेत्रीला चाहत्याने विचारला 'नको तो' प्रश्न!

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

एका चाहत्याने अभिनेत्रीला सोशल मीडियावर नको तो प्रश्न विचारला. अभिनेत्रीनेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

मुंबईः एका चाहत्याने अभिनेत्रीला सोशल मीडियावर नको तो प्रश्न विचारला. अभिनेत्रीनेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. यामुऴे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

'बर्फी', 'रेड' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने नुकताच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळा अनेक चाहत्यांनी चाहत्यांनी तिला तिच्या आवडीनिवडी, लाइफस्टाइल, छंद याविषयी काही प्रश्न विचारले. इलियानानेही त्यांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. मात्र, एका चाहत्याने सोशल मीडियाचे भान न राखता विचारले की, 'कोणत्या वयात तू तुझी व्हर्जिनिटी गमावलीस.' त्यावर इलियानाने सुद्धा सडेतोड उत्तर देताना म्हणाली, 'वॉव.. दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची फार हौस आहे वाटतं. यावर तुझी आई काय म्हणणार?'

दरम्यान, गेल्या महिन्यात जेव्हा अभिनेता टायगर श्रॉफ यानेही इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यालासुद्धा एका चाहताने असाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने म्हटले होते की, 'अरे निर्लज्ज माणसा, माझे आई-वडीलसुद्धा मला फॉलो करतात.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ileana DCruz shuts down a troll who asks about her virginity