बॉलीवूडमध्ये मी अजूनही नवखीच 

भक्ती परब 
शनिवार, 24 जून 2017

वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणारी हवा हवाई गर्ल श्रीदेवी म्हणतेय, "बॉलीवूडमध्ये मी अजून नवखीच आहे.' तिला विश्‍वासच बसत नाही आपण 50 वर्षांपासून या क्षेत्रात आहोत.

तिला असं वाटतंय ती तर नुकतीच आलीय बॉलीवूडमध्ये. "मॉम' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आणि जान्हवी कपूरला तिच्या बाबांसारखा नवरा मिळायला हवा या विधानामुळे श्रीदेवी सध्या चर्चेत आहे. "मॉम' हिंदीत प्रदर्शित झाल्यानंतर तो नुकताच तमीळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीदेवी बोलत होती.

हा एक साधा भावनाप्रधान कौटुंबिक चित्रपट आहे. दोन मुलींची आई असलेल्या या चित्रपटात मला खूप सार्धम्य जाणवलं. हा चित्रपट आजच्या तरुणाईसाठी आणि खास करून प्रत्येक कुटुंबातील आईसाठी आहे. 2015 मध्ये श्रीदेवीचा पुली (तमीळ) चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर आता "मॉम' तमीळ भाषेत आल्यामुळे श्रीदेवी खूप खूश होती. कारण तमीळ फिल्म इंडस्ट्रीविषयी तिच्या मनात खास आपुलकी आहे. खरंच अभिनयात श्रीदेवी अगदी नवोदितांनाही मागे टाकणारी आहे. तिने सदैव असंच चिरतरुण हसतमुख राहावं, अशीच तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. 
 
Web Title: I'm still new in Bollywood : sridevi