Ind vs Aus Final: हारकर जीतने वाले को... वर्ल्डकपनंतर कलाकारांचा भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा

भारतीय क्रिकेट संघाच्या वर्ल्डकप पराभवानंतर बॉलिवूड कलाकारांनी टीमला सपोर्ट केलाय
india vs australia worldcup final 2023 bollywood celebrities support team india
india vs australia worldcup final 2023 bollywood celebrities support team india SAKAL

Ind vs Aus Worldcup Final News: नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताचा एकतर्फी पराभव झाला. अंतिम सामन्यात भारताचा झालेला हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला. भावूक झालेल्या खेळाडूंना पाहून समस्त भारतीयांचे डोळेही पाणावले. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटींनी खेळाडूंची पाठराखण करत त्यांना सपोर्ट करताय. बघा काय आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

india vs australia worldcup final 2023 bollywood celebrities support team india
IND vs AUS 2023 Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का शर्माचेही डोळे पाणावले

अभिनेता अभिषेक बच्चनने X वर लिहिले, "चांगल्या प्रयत्नानंतर एक कठीण पराभव. संपूर्ण निळ्या रंगातील पुरुषांची प्रशंसनीय कामगिरी. तुम्ही आमची मान अभिमानाने उंचावलीय. या प्रवासासाठी धन्यवाद. #TeamIndia #CWC23."

चित्रपट निर्माते दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी X वर लिहिले, "अभिनंदन ऑस्ट्रेलिया. चांगले खेळला, भारत."

अभिनेता सोनू सूदने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, "टीम इंडिया तुम्ही आमचे कायमचे हिरो आहात #teamimdiafinal #team India."

अभिनेत्री काजोलने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, "हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं! टीम इंडिया चांगली खेळली. ऑस्ट्रेलियाचे आणखी एका विश्वचषकासाठी अभिनंदन! #worldCup फायनल."

अभिनेता आयुष्मान खुरानाने अभिनेता रणवीर सिंग आणि क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने लिहिले की, "पराजयाबद्दल खूप वाईट वाटले पण या भारत - ऑस्ट्रेलियामध्ये टक्कर होणे चांगले होते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com