India vs Pakistan: मॅचदरम्यान भर स्टेडियमध्ये अरजित सिंगने केलं अनुष्का शर्माचं फोटोशूट, व्हिडीओ व्हायरल

भारत पाकिस्तान मॅचदरम्यान गायक अरजित सिंगने अनुष्काचं फोटोशूट केलंय
india vs pak wc 2023 match photoshoot between arijit singh and anushka sharma video viral
india vs pak wc 2023 match photoshoot between arijit singh and anushka sharma video viral SAKAL

India vs Pakistan WC 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना काल झाला. भारताने उत्कृष्ट बॉलिंग आणि बॅटींगच्या जोरावर पाकिस्तानविरुद्ध एकहाती सामना जिंकला. या सामन्याच्या वेळी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने तुडूंब भरलेलं.

बॉलिवूडमधील अनेक तारे - तारका या सामन्याला उपस्थित होते. अशातच क्रिकेटपटू विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा आणि गायक अरजित सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. जाणून घ्या सविस्तर.

(india vs pak wc 2023 match photoshoot between arijit singh and anushka sharma video viral)

india vs pak wc 2023 match photoshoot between arijit singh and anushka sharma video viral
Ind Vs Pak: तिकडे पाकिस्तान ऑलआऊट अन् इकडे प्रेक्षक क्लीन बोल्ड, उर्वशीच्या रुपात स्टेडियममध्ये निळं वादळ

अरजितने केलं अनुष्काचं फोटोशूट

प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही भारत - पाकिस्तान मॅचदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्याने मॅच सुरू होण्यापूर्वी गाणी गाऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

अशातच अरजित आणि अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गायकाच्या फॅन पेजने शेअर केला आहे. यावेळी अरजित त्याच्या फोनमध्ये अनुष्काचा फोटो काढताना दिसत आहे. त्याच वेळी, अनुष्का देखील खास पोझ देत फोटोशूटचा आनंद घेतेय.

भारत - पाकिस्तान सामना पाहायला बॉलिवूड तारे - तारकांची मांदियाळी

भारत - पाकिस्तानचा वर्ल्डकप सामना पाहायला अनेक बॉलिवूड तारे - तारका उपस्थित होते. यावेळी शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, सुनिधी चौहान अशा अनेक गायकांनी सामना सुरु होण्यापुर्वी गाणी गाऊन सर्वांना खुश केलं.

याशिवाय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही सामना पाहायला उपस्थित होती. अनुष्का संपूर्ण सामन्यात रोहित शर्माच्या पत्नीच्या बाजूला बसली होती.

भारताने पाकिस्तानचा पराभव केला

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा काल आठवा विजय साजरा झाला. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत 192 धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने सहज पार केले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार कामगिरी करत 86 धावांची तुफानी खेळी केली.

त्याच्याशिवाय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही महत्त्वाचे योगदान होते. बुमराहने गोलंदाजीत आपली जादू दाखवत 2 बळी घेतले. त्याने पाकिस्तानचा फॉर्मात असलेला फलंदाज मोहम्मद रिझवानला 49 धावांवर क्लीन बोल्ड केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com